तुमचे पाय दुखतात का ? ‘या’ 3 कारणांमुळे होतो त्रास, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : पाय दुखणे ही समस्या अलिकडे जास्त वाढली आहे. एकाच ठिकाणी बसून अनेक तास काम करणे हे एक कारण असले तरी या समस्येची इतरही अनेक कारणे आहेत. शिवाय, ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होते. अनेकदा लहान मुले, तरूणांमध्ये सुद्धा पाय दुखत असल्याची तक्रार करतात. यासंबंधी इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्नामधिल संधोधकांनी केलेल्या रिसर्चमध्ये काही महत्वाचे खुलासे झाले आहेत ते जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे
1 आपण घालत असलेल्या बुटांमुळे पाय दुखण्याची समस्या होऊ शकते.

2 शूज पायांचा आकार बिघडवतात. जे सतत शूज घालतात, अश्या लोकांच्या पायाच्या टाचा, शूज कमी घालणार्‍यांपेक्षा तुलनेत वेगळ्या असतात.

3 कामासाठी बाहेर असताना सतत शूज घालावे लागतात. त्यामुळे पायावर परिणाम होऊन आकार बदलत असतो. त्यामुळे टाचा दुखतात आणि वेगवेगळ्या समस्या उद्भवतात.

हे लक्षात ठेवा
1 शूजचा वापर शक्यतो टाळून आरामदायक चप्पल घाला.

2 अश्मयुगातले शिकारी शूजचा वापर करत नव्हते. त्यांचा टाचा सध्याच्या माणसांच्या टाचांच्या तुलनेने लहान होत्या. त्याकाळाले लोकं अनवाणी पायांनी लांबलांब चालत जायचे. त्याच्या टाचा या खूप लवचीक होत्या, असेही निरिक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.