Reasons Of Sweating At Night | रात्री जास्त घाम येण्याच्या समस्येने तुम्हीही त्रस्त आहात का? जाणून घ्या काय असतात कारणं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्याच्या दिवसात घाम येणे (Sweating) स्वाभाविक आहे. परंतु नेहमीपेक्षा जास्त घाम येणे ही समस्या आपल्यासाठी चिंताजनक असू शकते. विशेषत: रात्री झोपताना आपल्याला जास्त घाम येत असेल (Reasons Of Sweating At Night) तर हे आजाराची लक्षणे असू शकतात. कोरोनाच्या ओमिकॉन (Corona Omicron Variant) प्रकारातून संसर्ग झाल्यासही रात्री अधिक घाम येणे हे लक्षण आहे (Reasons Of Sweating At Night). त्यामुळे घाम येण्याच्या त्रासाने तुम्हीही जास्त त्रस्त आहात का?

 

झोपताना आपल्या शरीराच्या तापमानात बदल होतो आणि कधीकधी यामुळे घाम येऊ शकतो. पण जास्त घाम येत असेल तर याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे (Reasons Of Sweating At Night).

 

आपण बर्‍याचदा चिंताग्रस्त किंवा तणावग्रस्त (Anxious or Stressed) असल्यास रात्री अधिक घाम येतो. मेंदूच्या अतिसक्रियतेमुळे शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला घाम येऊ शकतो. जास्त ताण घेतल्याने रक्तदाब (Blood Pressure) देखील वाढू शकतो ज्यामुळे आपल्यालाही ही समस्या उद्भवू शकते.

औषधांचा परिणाम (Effect Of Drugs) –
अनेक प्रकारच्या औषधांच्या सेवनामुळे जास्त घाम येऊ शकतो. जास्त घाबरण्याची गरज नाही. शरीराचे तापमान किंवा आपल्या घामाच्या ग्रंथी नियंत्रित करणार्‍या मेंदूच्या त्या भागावर ही औषधी परिणाम करतात. यामुळे या औषधांमुळे रात्री जास्त घाम येऊ शकतो. आपण याबद्दल आपल्या डॉक्टरांशी नक्कीच बोलले पाहिजे.

 

रजोनिवृत्तीची वेळ (Time Of Menopause) –
स्त्रियांमध्ये रात्री जास्त घाम येणे हे रजोनिवृत्तीचे लक्षण असू शकते. रजोनिवृत्तीच्या काळातही रात्री जास्त घाम येण्याचा अनुभव येतो. सुमारे ७५% पेरीमेनोपॉझल स्त्रियांमध्ये ही लक्षणे आढळतात. रजोनिवृत्तीनंतर पहिल्या काही वर्षांत ही वारंवारता सामान्यत: जास्त असते आणि नंतर कालांतराने कमी होते.

 

हायपरहाइड्रोसिसची समस्या (Hyperhidrosis Problem) –
हायपरहाइड्रोसिस नावाच्या समस्येमुळे काही जणांना जास्त घाम देखील येऊ शकतो. जरी या आजाराची रुग्ण फारच कमी आहेत,
परंतु जर आपल्याला जास्त घाम येत असेल तर आपण या समस्येबद्दल एखाद्या तज्ञाशी बोलले पाहिजे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Reasons Of Sweating At Night | reasons you may be sweating at night all you need to know

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Honey Health Benefits | आयुर्वेदात आरोग्याचा खजिना मानला जातो ‘हे’ औषध, ‘या’ आरोग्य समस्यांवर आहे सोपा घरगुती उपाय

 

Morning Health Tips | हेल्दी आणि एनर्जेटिक राहण्यासाठी ‘या’ गोष्टींनी करा आपल्या दिवसाची सुरूवात

 

Blood Sugar | डायबिटीजच्या रूग्णांसाठी लाभदायक ठरू शकते केळी! परंतु खाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात