मासिक पाळीत ‘पोटदुखी’ का होते? जाणून घ्या 2 कारणं आणि 5 उपाय

पोलीसनामा ऑनलाइन – अनेक महिलांना मासिक पाळीत खुप त्रास सहन करावा लागतो. महिन्यातील ते चारपाच दिवस त्यांना नकोसे वाटतात. अशक्तपणा, पोटदुखी, कंबरदुखी आणि अवयवांना सूज असाही त्रास होतो. काही तरूणी आणि विवाहित महिलांना पोटदुखीचा त्रास जास्त होतो. वेदनेमुळे त्यांना बाहेरही पडता येत नाही. तात्पुरता पेनकिलर गोळीचा उपाय हा त्रासदायक ठरू शकतो. मासिक पाळीच्यावेळी वेदना का होतात, आणि कोणते उपाय आहेत ते जाणून घेवूयात.

ही आहेत कारणे

1 मासीक पाळीत हार्मोन्स बदल वर्तनावर प्रभाव टाकतो. गॅस्ट्रोइन्टेस्टनल सिस्टमवर याचा परिणाम होतो. पचनसंस्थेवर या हार्मोन्सच्या बदलांचा परिणाम होतो. त्यामुळे गॅस होणे किंवा जुलाब होणे या समस्या उद्भवत असतात.

2 मासीक पाळीत गर्भाशयाच्या आतल्या भागातून प्रोस्टाग्लँडिन हे एक विशिष्ट प्रकारचं अ‍ॅसिड रिलीज होत असतं. त्यामुळे रक्तस्त्राव होण्यास मदत होते. त्याचा परिणाम मासपेशीं व पचनक्रियेवर होतो. त्यामुळे अपचन किंवा गॅसची समस्या उद्भवते.

अशी घ्या काळजी

* वेदनेपासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्या.
* गॅस होण्यापासून बचाव करायचा असल्यास पुरेसा व्यायाम करा.
* कमी आणि पचण्यास हलके अन्न खा.
* कोल्ड्रींक किंवा कॅफिनचे सेवन टाळा.

हे उपाय करा

1 जिरे-गूळ याचं पाणी हा उत्तम उपाय आहे.
2 मासिक पाळीत आरामदायक कपडे वापरा. घट्ट कपडे घालू नका.
3 झोपण्यापूर्वी पोट आणि कंबरेवर कोमट तेल लावून गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्या.
4 सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने अंघोळ करा. यामुळे स्नायूंना आराम मिळेल.
5 पोटावर हिंगाचे पाणी लावा.