अभिनेत्री प्रियंका चोप्रानं ‘या’ कारणांमुळे करिअर बुलंदीवर असताना सोडलं बॉलिवूड, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रियंका चोपडा आज तिचा ३७ वा जन्मदिवस साजरा करते आहे. २०१६ मधील ‘जय गंगाजल’ प्रियंकाचा बॉलीवूड मधील शेवटचा चित्रपट होता. या आधी तिने साल २०१५ मध्ये ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट केला होता. यामध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण सारखे कलाकार असतांना देखील तिची वाहवाही झाली. ‘दिल धड़कने दो’ आणि २०१४ मधील ‘मैरी कॉम’मुळे दमदार अभिनेत्रीच्या श्रेणी मध्ये ती पुढे आली. साल २०१६ पर्यंत प्रियंकाने बॉलीवूड मध्ये आपले एक स्थान निर्माण केले होते. तिच्या नावावरती चित्रपट चालत होते. आणि त्यानंतर जेव्हा प्रियंकाने बॉलीवूड चित्रपट करण्यास नकार दिला. परंतु लोकांना त्या गोष्टीचे कारण समजले नाही. अनेक प्रकारच्या अफवा देखील उडाल्या.

‘क्वांटिको’ ची ऑफर हॉलीवूड मध्ये संधी

प्रियंका चोपडा बॉलीवूड सोडण्याचे कारण एकच होते ते म्हणजे तिला अमेरिकी टीवी शो ‘क्वांटिको’ ची ऑफर मिळाली होती.

निक जोन्ससोबत प्रेम आणि लग्न

प्रियंका चोपडा बॉलीवूड मधून निघून जायचे कारण म्हणजे तिला निकवर प्रेम झाले होते आणि लग्न करायचे होते. निकला भेटल्यानंतर प्रियंकाने ‘क्वांटिको’ आणि ‘बे वाच’ साठी हो सांगितले होते. तिने बॉलीवूड सोडून जाण्याचे कारण सांगितले होते की तिला हॉलीवूड मधून ऑफर आली होती.

Loading...
You might also like