लघवीचा दुर्गंध ठरू शकतो ‘या’ 5 गंभीर आजारांचं कारण

आपल्या शरीरातील विषारी पदार्थ हे मूत्र आणि घामाद्वारे बाहेर पडत असतात. परंतु अनेकदा लघवी केल्यानंतर दुर्गंध येतो. याकडे दुर्लक्ष न करता आपण जास्ती जास्त पाणी प्यायला हवं. जाणून घेऊयात लघवीच्या दुर्गंधीमुळं कोणते आजार होण्याची शक्यता असते.

1) युरीनरी ट्रॅक इंफेक्कनशन (UTI) – हा एक असा आजार आहे ज्यात महिलांची गर्भ पिशवी खराब होत असते. यामुळं लघवी करताना आग होते. अशी समस्या जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका.

2) बॉडी डीहायड्रेशन – शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम योग्य असायला हवं. यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावं. असं न केल्यास लघवीचा रंग पिवळा होतो आणि दुर्गंध येतो. पोट साफ होण्यासाठीही समस्या येतात.

3) चुकीच्या पदार्थांचं सेवन – जास्त मसालेदार पदार्थ किंवा लसूण कांदा खाल्ल्यानंतर देखील लघवीचा वास येतो. मद्याचं अतिसेवन किंवा धूम्रपानामुळंही असं होऊ शकतं.

4) डायबिटीज – डायबिटीज हेही लघवीचा जास्त वास येण्याचं एक कारण आहे. हा एक असा आजार आहे जो मरेपर्यंत सोबत राहतो. याशिवाय महिलांना गरोदरपणात सुरुवातीच्या दिवसातही लघवीचा वास येतो.

5) एसटीडी (STD) – जर लघवीचा वास येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. खास करून महिलांनी. कारण असं होणं म्हणजे व्हजायनल इंफेक्श किंवा त्यापेक्षा जास्त गंभीर असण्याचा धोका असू शकतो. असं झाल्यास त्वरीत डॉक्टरांसोबत संपर्क साधावा.