महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ‘बंडखोर’ महायुतीचा खेळ बिघडवणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना महायुतीने हायटेक प्रचार केला असला तरी महायुतीमध्ये बंडखोरांना शांत करण्यात काही प्रमाणात यश आले. तरी देखील 55 बंडखोर महायुतीचा खेळ बिघडवणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या 55 बंडखोरांनीही प्रचारात मोठी आघाडी घेऊन महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची झोप उडवून दिली आहे.

महायुतीने राज्यातील 288 पैकी 200 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून ज्यांना तिकीट मिळाले नाही अशा दोन्ही पक्षातील जवळपास 100 जणांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांची मनधरणी केल्यानंतर निम्याहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मात्र, तरीही 55 बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून महायुतीच्या महत्त्वाच्या जागांवर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कल्याण पूर्वमध्ये भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर म्हणून धनंजय बोऱ्हाडे उभे आहेत. बोऱ्हाडे यांनी त्याच्या प्रचारामध्ये लावलेल्या फलकावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आनंद दिघेंचे फोटो लावले होते. चार वेळा नगरसेवक असलेले बोऱ्हाडे यांची पारंपारिक व्होटबँक असून शिवसैनिकांमध्ये त्यांच्याप्रती सहानुभूती आहे. त्यामळे भाजपचे गायकवाड यांचा विजय सोपा राहिलेला नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

कोकणात सावंतवाडीमध्ये शिवसेनेच्या दीपक केसरकरांविरोधात भाजपचे राजन तेली उभे आहेत. कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे. घाटकोपर पूर्वला शिवसेनेचे संजय भालेराव आणि वांद्रे पूर्वतून शिवसेनेच्याच विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंड केलं आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजपला मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचं सांगण्यात येतं.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या