आता भाजपसमोर बंडखोरीचं ‘आव्हान’ ? ‘हे’ 12 ‘बंडखोर’ उमेदवार खडसे आणि तावडेंच्या संपर्कात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपवर अनेक नेते नाराज असल्याची चर्चा असताना पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटरवरून भाजपचा उल्लेख टाळल्याने पंकजा मुंडे सुद्धा भाजपला सोडचिट्ठी देणार का ? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता भाजपसमोर सध्या बंडखोरीचे मोठे संकट असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हे बंडखोर सध्या एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांच्या संपर्कात असून वेगळा विचार करण्यासाठी या नेत्यांवर दबाव टाकत असल्याचे समजते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लक्षात घेऊन भाजपचे बंडखोर हालचाली करत असल्याचे समजते. भाजपकडून डावलले जाऊनही मोठे मताधिक्य मिळवलेले अनेक उमेदवार सध्या पक्षाची सत्ता गेल्याने अस्वस्थ असल्याचं सांगितलं जातंय. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मोठा फटका सहन करावा लागू शकतो अशी भीती बंडखोरांना आहे. त्यामुळे सध्या बंडखोरांकडून हालचालींना जोरदार वेग आला आहे.

बंडखोरांच्या यादीमध्ये मराठवाड्यापासून ते विदर्भापर्यंत अशा सर्वच भागातील बंडखोरांचा समावेश आहे. त्यामुळे आता हे बंडखोर भविष्याच्या विचाराने नेमकं काय हालचाली करतात हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

या नेत्यांना भाजपने डावलले होते तरीही यांनी चांगले मताधिक्य मिळवले.

सीमा सावळे – 18429 (दर्यापूर), योगेंद्र गोडे – 29943 (बुलडाणा), दिलीप कंडकुरते – 43357 (नांदेड दक्षिण), शमरजित सिंग घाटगे – 88303 (कागल), राजू बकाने – 39541 (देवळी), नरेंद्र पवार – 43209 (कल्याण पश्चिम), चरण वाघमारे – 79490 (तुमसर), निशिकांत भोसले – 43394 (इस्लामपूर), दिलीप देशमुख – 45846 (अहमदपूर), संतोष जनाथे -30952 (बोईसर), शिवाजी जाधव – 67070 (बसमत), समाधान अवताडे – 54124 (पंढरपूर)

अशा प्रकारची भली मोठी यादी भाजपच्या नाराज बंडखोरांची आहे त्यामुळे आपल्या भविष्याच्या कारकिर्दीसाठी हे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Visit : policenama.com