वारकऱ्यांकडून देणग्या उकळणारा ‘तो’ कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेकडो किलोमीटर पायी चालत तसेच वाहनांनी विठ्ठलच्या दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांच्या भक्तीचा स्वत:च्या फायद्यासाठी कर्मचाऱ्यांकडून गैरवापर केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंदिर समितीने दिलेली पावती पुस्तकांऐवजी जुन्या पावती पुस्तकाचा आधारे वारकऱ्यांकडून देणग्या उकळणाऱ्या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. सिद्धेश्वर घायाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मंदिर समितीने वारीच्या काळात देणगी स्वीकारण्यासाठी मंदिर व दर्शन मंडप परिसरात केंद्रे उभारली आहेत. देणगी स्वीकारण्याचे काम मंदिरे समिती स्वयंसेवक व हंगामी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. त्यासाठी अधिकृत पावती पुस्तकेही दिली आहेत.

अष्टमीच्या दिवशी श्री संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरात जाणाऱ्या पुलावर भाविकांनी घायाळकडे देणगी दिली. काही भाविकांनी दुसऱ्या ठिकाणी असलेल्या केंद्रावर देणगी दिली. त्यानंतर वारकाऱ्यांनी एकमेकांच्या पावत्या पाहिल्या असता त्या वेगवेगळ्या असल्याचे दिसून आले. त्यावरुन घायाळ याने दिलेली पावती इतर पावत्यांपेक्षा वेगळ्या असल्याचे लक्षात आल्यावर भाविकांनी तक्रार केली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे घायाळ यास रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यास तत्काळ निलंबित करण्यात आले.

 जिरे-आल्या चा रस प्या ! १० दिवसात पोट कमी करा

 कॅन्सर च्या उपचाराचा दावा करणाऱ्या मार्केटमुळे जगभरातील डॉक्टर चिंतेत !

 सावधान ! साबण आणि टूथपेस्ट ने होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

 डायनिंग टेबलपेक्षा जमिनीवर बसून जेवण करणे योग्य ; जाणून घ्या फायदे

 खुशखबर ! १००० हून अधिक ‘औषध -गोळ्या’ होणार स्वस्त

‘परफेक्ट’ लिपस्टिक लावण्यासाठी काही खास टिप्स – जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like