Tata Sky ची भन्नाट ऑफर ! 500 रुपयांचे रिचार्ज करा अन् टाटा टियागो कार जिंका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी डीटीएच कंपनी टाटा स्कायने ग्राहकांसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. टाटा स्कायने आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणली असून यामुळे टाटा टिगोर गाडी जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. दि. 8 जानेवारीपासून Tata Sky ची ही योजना सुरु झाली असून 6 फेब्रुवारी 2021 पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत 30 विजेत्यांना टियागो कार दिली जाणार आहे. या कारची सुरुवातीची किंमत 4.70 लाख रुपये आहे.

ग्राहकाने केवळ 500 रुपयांचे रिचार्ज केल्यावर एका सोप्या प्रश्नाचे उत्तर द्यावयाचे आहे, हे उत्तर बरोबर आले, तर लकी कॉन्टेस्टमध्ये ग्राहकांचा समावेश होणार आहे. यानंतर लकी ड्रॉ पद्धतीने दररोज एका ग्राहकाला टाटा टियागो जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासंदर्भातील एक ट्विटही टाटा स्कायने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून केले आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी केवळ 500 रुपयांचे रिजार्च करून लकी ड्रा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

टाटा स्कायने ग्राहकांसाठी TATA SKY REFER & EARN स्कीम सुरू केली आहे. या योजनेत ग्राहक आपल्या रेफरद्वारे मित्रमंडळींना टाटा स्काय कुटुंबासोबत जोडू शकतात. त्यात युजर्संना आणि त्यांच्या मित्रमंडळी दोघांनाही 200 रुपयांचे कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय तुमच्या मित्रमंडळीना टाटा स्काय एचडी कनेक्शनवर स्पेशल डिस्काउंट ऑफर केला जात आहे.