Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ दरम्यान घरी बनवा ‘मसाला राईस’ , जाणून घ्या बनविण्याची कृती

पोलीसनामा ऑनलाईन टीम  : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांमध्ये भीती पसरली आहे. या विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. ज्यामुळे लोक घरात बंधीस्त आहेत. अशा परिस्थितीत घरातील प्रत्येक काम करण्यासोबतच स्वयंपाक करणे हे बर्‍याच लोकांसाठी एक मोठे काम असते. अश्या वेळी रोज काय नवीन करायचे हा मोठा प्रश्न पडतो. तर या परिस्थिती आपण झटपट मसाला राईट बनवू शकता. तांदूळ आणि काही आवडत्या भाज्या घालून अवघ्या 20 मिनिटांत तयार होतो. जे आपण भरपेट खाऊ शकता. जाणून घेऊया मसाला भात बनवण्याची कृती

मसाला राईस बनवण्यासाठी साहित्य :
2 कप शिजवलेले आणि थंड झालेले तांदूळ
2 चिरलेले गाजर
2 चिरलेले बटाटे
9-10 चिरलेल्या शेंगा
हिरवा वटाणा एक तृतीय कप
6 बेबी कॉर्न कापलेला
1 चिरलेला कांदा
1 चमचा गरम मसाला पावडर
1 चमचा लाल तिखट
1 चमचा जिरेपूड
चवीनुसार मीठ

मसाला राईस बनविण्याची कृती :
प्रथम कढईत तेल टाकून गरम करा. गरम झाल्यावर त्यात जिरे आणि नंतर कांदे घाला आणि थोडा मऊ होईपर्यंत तळा. आता चिरलेली भाजी घाला आणि दोन मिनिटे तळा. मीठ, तिखट, गरम मसाला आणि जिरेपूड घाला, चांगले मिक्स करा आणि 10-12 मिनिटे झाकून ठेवा. आता या व्हेज मसाल्यात तांदूळ घाला आणि मिक्स करावे. तुमचा मसाला भात तयार आहे. रायताबरोबर सर्व्ह करा.