नवरात्री रेसीपी : मखानाच्या खीरसह बनवा या 2 टेस्टी डिश, झटपट होतात तयार

पोलिसनामा ऑनलाइन – शारदीय नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. 9 दिवस चालणार्‍या या सणात अनेक लोक उपवास करतात. उपवासदरम्यान असे डाएट घेतले पाहिजे, ज्यामध्ये जास्त प्रमाणात पोषकतत्व असतात. यासाठी मखाना योग्य आहे. यामध्ये कमी प्रमाणात कॅलरी, कोलेस्ट्रॉल आणि फॅट आढळते. याशिवाय यामध्ये जास्त मात्रेत अँटी-एंफ्लीमेट्री गुण आढळतात, जे अनेक आजारापासून रक्षण करतात. कोरोना काळात याच्या सेवनाने इम्यूनिटी देखील मजबूत होईल. मखानाची खीर, मखाना नमकीन आणि मखाना बटाटा भाजी कशी बनवायची ते आपण आज जाणून घेणार आहोत.

मखानाची खीर
थोडे मखाने, दूध, ड्रायफ्रुट्स घ्या. सर्वप्रथम ड्रायफ्रुट्स कापून घ्या. आता पॅनमध्ये दूध गरम करा. जेव्हा ते थोडे दाट होईल तेव्हा त्यामध्ये मखाना आणि ड्रायफ्रुट्स टाकून मंद आचेवर उकळू द्या. सुमारे पाच मिनिटांनंतर यामध्ये साखर टाका. लागोपाठ 5-6 मिनिटे हलवत राहा आणि गॅस बंद करा.

मखाना नमकीन
फ्राई केलेल्या मखानामध्ये शेंगदाणे, काजू, पिस्ता, मनूका टाकून फ्राई करा. यानंतर यामध्ये सैंधव मीठ टाका, आमचूर पावडर टाकून मिसळा. तुमचे लज्जतदार मखाना नमकीन तयार आहे.

मखाना बटाटा भाजी
सर्वप्रथम टोमॅटो आणि सर्व मसाले टाकून शिजवा. यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाका. यानंतर मखाना टाकून थोडे पाणी टाका. किमान पाच मिनिटे शिजल्यानंतर गॅस बंद करा.