सावधान ! PAN किंवा Aadhaar नंबर चुकला तर भरावा लागेल ‘एवढा’ दंड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्राप्तीकर विविरण भरायचं असेल तर त्यासाठी आधार आणि पॅन नंबर असल्याशिवाय भरता येत नाही. त्यामुळे तुम्ही आधार नंबर किंवा पॅन नंबर टाकताना काळजी घ्यायला हवी. कारण यात जर काही चूक झाली तर तुम्हाला महागात पडू शकतं. जर यात चूक झाली तर तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे आधार नंबर किंवा पॅन नंबर भरताना काळजी घ्यायला हवी.

केंद्र सरकारनं 2019च्या अर्थसंकल्पात प्राप्तीकर अधिनियम 272 बी मध्ये संशोधन केलं आहे. यात प्राप्तीकर अधिनियम कलम 272 नुसार जर एखाद्या व्यक्तीनं दिलेला पॅन किंवा आधार नंबर चुकीचा असेल तर प्राप्तीकर अधिकारी त्याला 10 हजारांचा दंड आकारू शकतो. मात्र अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर असते.

सल्लागार के सी गोदुका यांच्या मते, जर प्राप्तीकरदात्याला दंड आकारला गेला तर त्याला त्याची बाजू मांडण्याचाही अधिकार दिला जाऊ शकतो. मात्र अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी ही अधिकाऱ्यावर राहील.

जर तुम्हाला कोणतंही रिटर्न भरायचं असेल तर तुम्हाला यावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. असे केल्यास तुम्ही अडचणीत सापडणार नाही असे मत सल्लागारांचे आहे. रिटर्न भरण्यापूर्वी प्राप्तीकर खात्याच्या वेबसाईटवर पॅनची पडताळणी करण्याचा पर्याय येतो. त्यानंतरच रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तुम्ही पडणताळणी करून व्यवस्थिपणे रिटर्न भरू शकता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/