पुण्यातील गुन्हे शाखेची पुर्नरचना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचा विस्तार करत त्याचा विस्तार करण्यात आला आहे. वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी नव्या आयुक्तांनी गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी नव्या पद्धतीने हा विस्तार करत गुन्हे शाखा मजबूत केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज हा विस्तार केला आहे.

पुणे शहर गुन्हे शाखेचा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील दबदबा होता. पण गेल्या काही वर्षात हा दबदबा कमी झाला. त्यातही पूर्व आयुक्तांनी तर गुन्हे शाखेचे “पंख कापत” काही विभागच बंद करून टाकले आणि काही मोजक्याच पथकांवर कारभार केला. पण याचा गुन्हेगारी वाढीला परिणाम झाला. यावेळी पोलीस दलात याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होती. तसदच गुन्हेगारीत वाढ झाल्यानंतर गुन्हे शाखा मजबूत करण्याची गरज असल्याचे देखील काही जानकर अधिकारी बोलू लागले होते.

नवे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बेसिक पोलिसिंगवर भर दिला आहे. गुन्हेगारांना लगाम लावण्यासाठी कडक पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार काम सुरू देखील झाले आहे. आता गुन्हे शाखेला मजबूत करण्यासाठी आयुक्तांनी पाऊल उचलले आहे. त्यानुसार नव्या गुन्हे शाखेची पुनर्रर्रचना करण्यात आली आहे.

अशी आहे नवी गुन्हे शाखा…

पोलीस आयुक्त —

अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा —
त्यानंतर दोन पोलीस उपायुक्त. त्यात एक गुन्हे शाखा व आर्थिक व सायबर गुन्हे शाखा (आवसा)
त्याखाली सहायक पोलीस आयुक्त 3 असणार आहेत. त्यात एक व दोन गुन्हे शाखा व तिसरा आवसा

सहाय्यक आयुक्त – I

प्रशासन
युनिट-1
युनिट-2
युनिट-3
अमली पदार्थ विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहन चोरी पथक
पीसीबी
एमओबी व प्रतिबंधक

सहाय्यक आयुक्त – II

युनिट 4
युनिट 5
खंडणी विरोधी पथक
दरोडा विरोधी व वाहनचोरी पथक
भरोसा
सेवा माध्यम प्रणाली
तपास व अभियोग सहाय्य कक्ष

सहाय्यक आयुक्त तीन (आर्थिक गुन्हे शाखा)
सायबर पोलीस ठाणे
संगणक विभाग
कॉप्स एक्सलन्स विभाग

* बदल करण्यात आलेल्या गुन्हे शाखेच्या पुनर्ररचनेत म्हत्वाचा सामाजिक सुरक्षा विभाग थेट पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेच्या एकच्या अंडर काम करणार आहे. तसेच त्यासोबतच तांत्रिक विश्लेषण विभाग देखील उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली असणार आहे.

* एमओबी व प्रतिबंधक विभाग एकत्रित काम करणार आहे. तसेच तपास अभोयोग विभाग देखील एकत्रित काम करतील.