Corona Update : कोरोनामुळे ‘विक्रमी’ 1340 मृत्यू, ब्लॅक फ्रायडेने 57% लोकसंख्येला केले घरात ‘कैद’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दररोज येणारे कोरोनाच्या नवीन प्रकरणांचे आकडे विक्रम करत आहेत. या दरम्यान शुक्रवारी एकाच दिवसात 1340 मृत्यूंनी देशातील कोरोनाची भितीदायक स्थिती जगासमोर आणली आहे. विक्रमी मृतांचा अंदाज या गोष्टींवरून लावला जाऊ शकतो की, स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांना तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे. हॉस्पिटल बाहेर रूग्णांच्या मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. मृतांच्या आकड्यांनी देशाला अस्वस्थ केलेले असतानाच कोरोना संक्रमित रूग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा देशाच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येला घरांमधून कैद केले आहे.

शुक्रवारी कोरोना संक्रमितांच्या संख्येने पुन्हा एकदा विक्रम मोडला आहे. देशात एका दिवसात 2,33,869 नवी प्रकरणे समोर आली. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांनी देशाच्या बहुतांश भागांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मागे हटण्यास भाग पाडले आहे. देशात 15 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी रात्रीचा कर्फ्यू किंवा वीकेंड कर्फ्यू लावला आहे. स्थिती अशी आहे की, विविध प्रतिबंधामुळे देशातील अर्धी लोकसंख्या (57%) आपल्या घरांमध्ये कैदा झाली आहे.

शुक्रवारच्या अगोदर, अखेरचे भारताने एका दिवसात सर्वात जास्त मृत्यू 15 सप्टेंबरला नोंदले होते, जेव्हा 1,284 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एका विश्लेषणानुसार, पुढील दोन दिवसात देशभरातील 700 मिलियनपेक्षा जास्त लोक मर्यादित कालावधीसाठी कर्फ्यूचा सामना करतील. भारतात कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेनंतर ज्या प्रकारची स्थिती तयार झाली आहे ती पाहिल्यानंतर अशा प्रकारच्या प्रतिबंधांची आवश्यकता जाणवू लागली आहे.