Coronavirus in Pune : पुण्यात 50 दिवसांमध्ये 53 हजार रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे, ता. ९ : पोलीसनामा ऑनलाइन : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत पुण्यात कोरोना covid pune रुग्णांची बरीच तारांबळ उडाली होती. पुण्यात एप्रिल महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५६ हजारावर पोहोचली होती. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात कोरोनाबाधित covid pune रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होतं आहे.. त्यानंतर मागील ५० दिवसांत शहरात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ५२ हजार ८४७ ने कमी झाली आहे. आता शहरात केवळ ३ हजार ६९९ सक्रीय रुग्णसंख्या आहे. त्यामुळे शहरात सध्या ८ हजाराहून अधिक बेड शिल्लक आहेत. पण सध्या महाराष्ट्रात अनलॉकला सुरुवात केली आहे. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या पुणे शहरात केवळ ३ हजार ६९९ सक्रिय रुग्ण उरले आहेत. यातील १ हजार ९६९ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित १ हजार ७३० रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या ८ हजार २२९ खाटा रिकाम्या झाल्या आहेत.

असं असलं तरी आरोग्य शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला आहे.

ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत तिसरी लाट येण्याचा संभाव्य धोका वर्तवण्यात आला आहे.

कोरोना विषाणूची तिसरी लाट अत्यंत संसर्गजन्य असून याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

त्यामुळे एकीकडे रुग्णसंख्येत घट होत असली तरी येणाऱ्या संभाव्य धोक्याला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचा इशारा शास्त्रज्ञांकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, पुणे शहरात १८ एप्रिल २०२१ रोजी कोरोना रुग्णांच्या संख्येनं उच्चांक गाठला होता.

या दिवशी शहरात एकूण सक्रिय रुग्णांची ५६ हजार ५४६ वर पोहोचली होती.

त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली होती.

पण दरम्यान राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पुण्यात कोरोनाचा आलेख घसरायला सुरुवात झाली.

तेव्हापासून आजपर्यंत मागील ५० दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.

२८ एप्रिल २०२१ रोजी उपचाराधिन असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या १० हजार ३९८ इतकी होती. त्यानंतर ही संख्या मागील ४० दिवसांपासून सातत्याने कमी होत गेली आहे.

Also Read This : 

 

तुमचे आरोग्य उत्तम ठेवतो ‘आर्टिस्टिक योगा’

 

Narendra Modi | BJP चा मोठा निर्णय ! राज्यांतील विधानसभा निवडणुकामध्ये आता पीएम मोदींचा चेहरा वापरण बंद

 

डोळ्यांचा थकवा ‘असा’ दूर करा