गेल्या चार वर्षात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन; पंतप्रधान मोदी यांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चार वर्षात इथेनॉलचे विक्रमी उत्पादन झाले अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B01LET6KYA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a30f63e-9c64-11e8-a066-0bb590c0a9f7′]
ऊसापासून इथेनॉल निर्मितीला अटलबिहारी वाजपेयी सरकारने चालना दिली होती. नंतर हा कार्यक्रम थंडावला होता. २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रॅम हा उपक्रम हाती घेतला. त्यातून चार वर्षात फक्त शेतकरी नव्हे तर देशाचा फायदा झाला. चार हजार कोटी इतके परकीय चलनाची बचत झाली. हा कार्यक्रम राबविल्यास पुढील चार वर्षात बारा हजार कोटींची परकीय चलनाची बचत होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.