येडियुरप्पांचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्रीपदाचे रेकार्ड अनब्रेकेबल : अजित पवार

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन

कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री येडीयूरप्पांचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्री होण्याचे रेकार्ड देशातील कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा पक्ष तोडू शकणार नाहीत .अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन आणि हल्ला बोल आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक पार पडली.यावेळी पुणे शहर अध्यक्ष आणि खासदार वंदना चव्हाण,पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे,प्रवक्ते अंकुश काकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी, अजित पवार म्हणाले की,कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने काँग्रेस आणि जेडीयु चे आमदार फोडण्यासाठी काही कोटींची ऑफर दिल्याच्या ऑडिओ क्लिप समोर आलया होत्या .यातून भाजपची मानसिकता दिसून येते .त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी सारवासारव देखील केल्याचे काल दिसून आले आहे.अशा शब्दात त्यांनी भाजपच्या कार्यपध्द्तीवर निशाणा साधला.

केंद्र सरकार देशात जीवनावश्यक वस्तू वरील दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरले असून, दर पंधरा दिवसाला पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होताना दिसत आहे.यामुळे सर्व सामान्य नागरिकाचे जगणे मुश्किल झाले आहे.हे लक्षात घेता.पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केली पाहिजे.असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

पुण्यातील 10 जूनच्या सभेत छगन भुजबळ बोलणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मागील दोन वर्षांपासून अटकेत होते.त्यांची जामिनावर सुटका झाली असून त्यांना मी त्यांना भेटलो असून पुण्यात होणाऱ्या 10 जून रोजी च्या सभेत बोलणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.