गुन्हे शाखेतील ‘सेटिंग’बाजांची तडकाफडकी बदली

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – गॅस सिलेंडरचा काळा बाजार करताना पकडण्यात आले व्यक्तीवर कारवाई करण्याऐवजी सेटिंग करण्यावरून ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिट ३ च्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाले. या वादाचे रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. हा प्रकार उघड झाल्याने गुन्हे शाखेची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

उल्हासनगर परिसरात गॅसचा काळाबाजार सुरु असल्याची बाब ठाणे गुन्हे शाखेने आठ दिवसांपूर्वी उघडकीस आणली होती. काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बगडा उचलण्याऐवजी पोलीस सेटिंग करताना पहायला मिळत आहेत. काळाबाजार करताना एकाला पकडण्यात आले होते. त्याच्यावर कारवाई न करण्यासाठी तो आपल्याला पैसे देत असल्याची कबुली गुन्हे शाखेत काम करणाऱ्या एका हवालदाराने दिली आणि हे कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे.

उल्हासनगर येथील एचपी गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या लक्ष्मण जाधवला गॅस सिलेंडर चोरताना गुन्हे शाखेचे कर्मचारी जावेद मुलाणी आणि सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले यांनी पकडले होते. यावेळी लक्ष्मणने स्वत:ला कारवाईपासून वाचवण्यासाठी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार भरत नवले यांना फोन करून तो फोन जावेद मुलानी यांच्याकडे दिला. त्यांच्यामध्ये झालेले संभाषण लक्ष्मणचा मित्र विलास शेळके याने व्हायरल केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

हा प्रकार उजेडात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठिशी घातले जात आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी कानावर हात ठेवत हे रेकॉर्डिंग खोटे असल्याचे सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे या वादात अडकलेल्या सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नवले, पोलीस हवालदार भरत नवले आणि जावेद मुलानी यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर