Coronavirus : शरीरात लपलेला असतो ‘कोरोना’ ! बरे झालेले 51 रुग्ण पुन्हा ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस रोखण्यासाठी ज्या देशाचे जगभरातून कौतूक होत आहे, त्याच देशातील 51 कोरोनामुक्त रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळले आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोना पसरण्यास सुरुवात झाल्यापासून मोठ्या प्रमाणात लोकांची चाचणी करण्यास सुरुवात केली होती. यामुळे दक्षिण कोरियात कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आला. परंतु आता तेथे पुन्हा 51 बरे झालेल्या रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता तिथे पुन्हा चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

वृत्तानुसार, कोरोनामुळे पॉझिटिव्ह आलेल्या लोकांना दक्षिण कोरियाच्या डॅगूमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु चाचणीचे परिक्षण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना क्वारंटाइनमधून सोडण्यात आले होते परंतु आता 51 दिवसांनी ते पुन्हा पॉझिटिव्ह आढळले.

दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, कोरोना व्हायरस मानवी शरीरात अशा ठिकाणी लपून बसतो की त्यांचा शोध घेणं अवघड होऊन बसतं. दक्षिण कोरियामध्ये आतापर्यंत जवळपास 10,300 कोरोनाग्रस्त आढळले. तर 192 लोकांचा मृत्यू झाला. डॅगू परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे.

दक्षिण कोरियाच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रीवेंशनच्या मते असे वाटत आहे की रुग्ण पुन्हा बाधित झालेले नाहीत तर व्हायरस त्यांच्या शरीरात पुन्हा सक्रिय झाला. तर ब्रिटिश तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत असे पुरावा मिळाले नाहीत ज्याने सिद्ध होईल की रुग्णाच्या शरीरात पुन्हा व्हायरस सक्रीय होतो.

ब्रिटेनच्या ईस्ट एन्गलिया यूनिवर्सिटीमध्ये संक्रमित रोगांचे प्रोफेसर पॉल हंटर म्हणाले की मला वाटते की रुग्ण पुन्हा बाधित होऊ शकत नाही. परंतु मी असा हा विचार करत नाही की रुग्णांमध्ये व्हायरस पुन्हा सक्रीय झाला. मला वाटते की त्यांच्या करण्यात आलेल्या चाचणीत त्यांची परिक्षण चुकून निगेटिव्ह आले असतील.

प्रोफेसर हंटर म्हणाले की पारंपारिक पद्धतीने कोरोना व्हायरसच्या ज्या चाचण्या केल्या जात आहेत त्यातील 20 ते 30 टक्के शक्यता चुकीचा परिणाम देत आहेत. ते म्हणाले, क्वारंटाइनमधून सोडताना ज्या रुग्णांच्या चाचणी निगेटिव्ह आल्या असतील त्या चुकीच्या असतील. शक्यतो त्यावेळी देखील ते रुग्ण बाधितच असतील.

कोरियाच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रीवेंशनचे डायरेक्टर जनरल इउन किओंग म्हणाले, डॅगुमध्ये या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. यापूर्वी जपानच्या तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती की रुग्ण पुन्हा संक्रमित होऊ शकतात कारण तेथे देखील एका महिला आणि पुरुष पुन्हा पॉझिटिव्ह आढळले होते.

लीड्स यूनिवर्सिटीमध्ये वायारोलॉजीचे प्रोफेसर मार्क हॅरिस यांनी सांगितले की रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आढळणे हे चिंताजनक आहे. ते म्हणाले, याची शक्यता कमी आहे की रुग्ण पुन्हा संक्रमित झाले असतील कारण ते पहिल्यांदा इम्यून रेस्पॉन्स डेवलप करतात.

प्रोफेसर मार्क हॅरिस म्हणाले, दुसरी शक्यता ही आहे की रिपोर्ट निगेटिव्ह आले असतील तेव्हा रुग्ण संक्रमण मुक्त झालेले नसतील. जाणकारांचे असेही म्हणणे आहे की अशी प्रकरणं अपवादात्मक आहेत.