Post-Covid complications : कोरोनातून रिकव्हर झाला आहात ? पोस्ट कोविड लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसमधून रिकव्हर झालेले रूग्ण पूर्णपणे निरोगी नसतात, उलट त्यांच्यात पोस्ट कोविड लक्षणे सुद्धा दिसतात. यामुळे निराशा येते. रूग्णांच्या मेंट्रल स्ट्रेंथवर परिणाम होतो. यासाठी पोस्ट कोविड लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्यावर उपचार करा. पोस्ट कोविड लक्षणे कोणती आणि त्यांचे उपचार कसे करावेत ते जाणून घेवूयात…

पोस्ट कोविड लक्षणे :

* एंजायटी, निगेटिव्ह विचार, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीची कमतरता, झोप न येणे.

* तसेच इतर लक्षणे जी हृदय कमजोर होण्याकडे इशारा करतात.

* धडधड वाढणे, थकवा आणि कमजोर, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे.

* अशी लक्षणे दिसल्यास अस्वस्थ होऊ नका. यावर उपचार करा. ही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा.

कसे कराल या लक्षणांवर उपचार :

* रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपू नका म्हणजे रात्री चांगली झोप येईल.

* रात्री झोप न येणे कोविड रिकव्हर रूग्णांमध्ये सर्वात मोठी समस्या आहे, झोपताना गॅझेट्स जवळ ठेवू नका.

* झोपण्यापूर्वी अर्धातास अगोदर योगा आणि मेडिटेशन आवश्य करा. कमी झोपेमुळे मेंटल हेल्थ बिघडू शकते.

* सतत बिछाण्यावर राहू नका. झोपणे आणि उठण्याची वेळ ठरवा, आणि पालन करा.

* छातीत वेदना, धडधड वाढणे अशी लक्षणे हृदय कमजोर होण्याची लक्षणे आहेत. यामुळे ऑक्सीमीटरने धडधड चेक करा. सामान्यपणे 60-100 च्या दरम्यान धडधड असावी, यापेक्षा कमी किंवा जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

* कोरोना व्हायरस फुफ्फुसे, हृदय आणि शरीरातील इतर अवयवांना प्रभावित करत आहे. यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. छातीत वेदना झाल्याने हार्ट अटॅकचा धोका खुप वाढतो, यासाठी डॉक्टरांकडे जा.

* ही सर्व लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांकडे जा.

* पोस्ट कोविड लक्षणांनी घाबरू नका, सिम्टमेटिक उपचार करा.

* खुप जास्त कमजोरी जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नका.

* कोरोना फुफ्फुसे, हृदय, मांसपेशी, आतडे किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवांना प्रभावित करू शकतो. कोरोना बरा झाल्यानंतर सुद्धा आपल्या शरीरात दिसणार्‍या कोणत्याही लक्षणांना सहज घेऊ नका, उपचार करा.