बॅंकिंगमध्ये करियर करणार्‍यांसाठी ‘सुवर्ण’संधी ! 12,899 जागांसाठी ‘मेगा’ भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याच दिवसांपासून बँक भरतीच्या प्रतीक्षेत वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच सरकारी बँकांमध्ये भरती सुरु होणार आहे. अनेक सरकारी बँकांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध आहे. त्यात आयबीपीएसद्वारे भरती, एसबीआय आणि रिझर्व्ह बँक यांचा समावेश आहे.

12899 पदांवर मेगा भरती
आयबीपीएस 12 हजार क्लार्क पदांवर तुमची परीक्षा घेईल. यासंबंधीचे अर्ज सुरू केले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) 700 पदांवर भरती होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B साठी 199 पदांवर व्हेकन्सी आहे. IBPS क्लार्कच्या 12 हजार पदांवर भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालंय. अर्ज करण्यासाठी www.ibps.in इथे क्लिक करा.

या बँकांमध्ये होणार आहे मेगा भरती
आंध्र बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, यूको बँक, बँक ऑफ बडोदा, कॉर्पोरेशन बँक, इलाहाबाद बँक, कॅनरा बँक, इंडियन ओवरसीज बँक, सिंडिकेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, भारतीय बँक, पंजाब आणि सिंध बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांमध्ये मेगा भरती होणार आहे.

IBPS क्लार्कच्या 12 हजार पदांवर भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालंय.
अर्ज करण्यासाठी www.ibps.in इथे क्लिक करा.

SBI मध्ये अप्रेंटिससाठी 700 पदांवर भरती केली जाणार आहे. या पदांवर अर्ज स्वीकारणं सुरू आहे. अर्जाची शेवटची तारीख आहे 6 ऑक्टोबर 2019. sbi.co.in/career वर जाऊन अर्ज करा.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये Grade B (DR)च्या ऑफिसर पदांसाठी 199 व्हेकन्सीज आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 11 ऑक्टोबर 2019. अर्ज करण्यासाठी rbi.org.in इथे अर्ज करा.

नुकतेच रिझर्व्ह बँकेने बँकांचे विलीनीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात रोज छोटे मोठे बदल होताहेत. मात्र सरकारी बँकांमध्ये मोठी मेगा भरती होणार आहे.