नोकरीची मोठी संधी ! CRPF च्या 789 पदांसाठी भरती, 31 ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  आता केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात CRPF मध्ये 789 जागांची भरती निघाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तसेच एमपीएससी चपम युपीएससी परीक्षांमध्ये पीएसआय, तत्सम पोस्टसाठी मेहनत घेणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे.

देशात मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने भरती प्रक्रिया पूर्णपणे बंद होती. मात्र, केंद्र सरकारने आता भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 789 पदांसाठी भरती निघाली आहे. यात निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार हि पदे आहेत. त्यासाठी, उमेदवारांनी 31 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दाखल करता येणार असून या परीक्षेसाठी 20 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, 31 ऑगस्टपर्यंत अंतिम तारीख आणि मुदत दिली आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी निघालेल्या जाहिरातीनुसार या पदांसाठी 20 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहे.

CRPF भरती, 789 जागा

निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार
Official Notification : https://bit.ly/2ZOtWVP
Official Website : https://crpf.gov.in/recruitment.htm
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31/08/2020