बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी ! राज्यात क्लार्क पदासाठी 1257 जागांची मेगा भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरीची मोठ्या प्रमाणात संधी आहे. देशभरात या बँकांमध्ये क्लर्क या पदासाठी मेगा भरती होणार असून यामध्ये महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत. देशातील कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युसीओ बँक, बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, कॉपरेशन बँक, इंडियन ओवरसिज बँक, सिन्डीकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, इंडियन बँक, आंध्रा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रासाठी हि भरती होणार असून 12 हजार जागांची भरती होणार असल्याची घोषणा आयबीपीएसने केली आहे.

17 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकणार आहात. या परीक्षेसाठी पुर्व परिक्षा आणि मुख्य परीक्षेच्या माध्यमातून हि निवड केली जाणार आहे. पुर्व परीक्षा हि 7, 8, 14 आणि 15 तारखेला होणार आहे. तर मुख्य परीक्षा हि 19 जानेवारी 2020 मध्ये घेतली जाणार आहे. 19 ऑक्टोबर 2019 हि अर्ज करण्याची शेवटची तारीख असून नोव्हेंबर महिन्यात हॉल तिकीट वाटप करण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात 1257 जागा आहेत. अधिक माहितीसाठी https://www.adda247.com/jobs/wp-content/uploads/2019/09/IBPS-CRP-Clerk.pdf या वेबसाईटवर भेट द्या.

आरोग्यविषयक वृत्त –