इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 200 जागांसाठी भरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या कंपनीत 200 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ECIL ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर या पदांसाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. चार महिन्यांसाठी या दोनशे जागा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असतील. यासाठी अखेरची तारीख 11 ऑक्टोबर आहे.

पदांची संख्या – 200

पदाचे नाव –  ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर (JTO)

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्टूमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST: 50% गुण]

वयाची अट: जन्म 30 सप्टेंबर 1989 नंतर. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2019

फी – अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

वेतन – 20,072 रूपये

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कागपत्रांसह पडताळणीसाठी बोलावले जाईल.

वेबसाइट – http://www.ecil.co.in/
अर्ज भरण्यासाठी लिंक – careers.ecil.co.in/advt4019.php

Visit : Policenama.com