Indian Post Recruitment 2020 : भारतीय टपाल विभागात ३२६२ पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर

पोलिसनामा ऑनलाइन – भारतीय टपाल विभागात बीपीएम/ एबीपीएम/ डाक सेवक या पदांसाठी एकूण ३२६२ जागांसाठी भरती निघाली आहे. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन सुविधा आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ जुलै २०२० आहे.

कोणती पदे आहेत ?
भारतीय टपाल विभागात निघालेल्या भरतीत बीपीएम/ एबीपीएम/ डाक सेवक या जागांसाठी रिक्त पदे आहेत.

पदसंख्या
भारतीय टपाल विभागातील बीपीएम/ एबीपीएम/ टपाल सेवक यांच्या जागांसाठी एकूण ३२६२ पदसंख्या आहे.

शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार १० वी पास असावा.

शुल्क
या पदांसाठी ओसी/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ ट्रान्स मॅन उमेदवारांकरिता १०० रुपये शुल्क असेल.

भारतीय टपाल विभागात निघालेल्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यासाठी २२ जून २०२० रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२० आहे. पात्र उमेदवार भारतीय विभागाच्या www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.