खुशखबर ! बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई : वृत्तसंस्था – बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑफिसर पदासाठी भरती निघाली असून एकूण ४६ जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ५ ऑगस्ट पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून अर्जाची प्रिंट पोस्टाद्वारे पाठवायची आहे. याबद्दलची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :

एकूण जागा : ४६

पदाचे नाव आणि पद संख्या

१. लॉ ऑफिसर- २५

२. सिक्योरिटी ऑफिसर- १२

३. फायर ऑफिसर- ०१

४. इन्फॉर्मेशन सिस्टम (IS)ऑडिटर- ०५

५. इकोनॉमिस्ट – ०१

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.१: ५५ % गुणांसह LLB (SC/ST/PWD:५०% सूट) तसेच ०५ वर्षे अनुभव आवश्यक

पद क्र.२: कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि सशस्त्र सेना / अर्धसैनिक दलात कमिशन ऑफिसर किंवा कप्तान पदाच्या समकक्ष म्हणून किमान ५ वर्षे सेवा.

पद क्र.३: BE (Fire) तसेच ३ वर्षे अनुभव

पद क्र.४: ५५% गुणांसह B.Tech / B.E. (Computer Science / IT) / MCA / MCS / M.Sc. (Electronics / Comp.Science) किंवा CA तसेच ०३ वर्षे अनुभव

पद क्र.५: अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी आणि ६ वर्षे अनुभव आवश्यक

पद क्र.६: अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी तसेच ०२ वर्षे अनुभव

पद क्र.७: ICWA /MA (Economics) त्याचबरोबर ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ३० जून २०१९ रोजी

पद क्र.१: २५ ते ३५ वर्षे

पद क्र.२: २५ ते ४० वर्षे

पद क्र.३:२५ते ४० वर्षे

पद क्र.४:२५ ते ३५ वर्षे

पद क्र.५: २८ ते ४० वर्षे

पद क्र.६: २३ ते ३३ वर्षे

पद क्र.७: २३ ते ३३ वर्षे

परीक्षा शुल्क : General /OBC: ७०८ रुपये याशिवाय SC/ST/PWD या कॅटेगरी मधील उमेदवारांना सूट असून ११८ रुपये एवढे शुल्क असेल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा :

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची सुरुवात : ५ ऑगस्ट २०१९

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ ऑगस्ट २०१९

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: २९ ऑगस्ट २०१९

पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005

याविषयीची सविस्तर जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक : https://www.bankofmaharashtra.in/Current-Openings.asp

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like