खुशखबर ! तिन्ही सैन्य दलात लवकरच मोठी भरती ; तब्बल ७८ हजार २९१ पदे रिक्‍त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला जर भारतीय सैन्यात भरती व्हायचे असेल तर आता लवकरच ही सुवर्ण संधी येणार आहे, कारण येत्या काही काळात लष्करासह, नौदल आणि वायू दल अशा तिन्ही दलांमध्ये भरती सुरु होणार आहे. कारण या तिन्ही दलांमध्ये आधिकाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. हा मुद्दा राज्यसभेत एक प्रश्न उत्तराच्या दरम्यान संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, तीनही दलात ७८२९१ जागा रिक्त आहेत. यात ९४२७पदे ही अधिकारी रॅकच्या आहेत. तर ज्युनियर पदाची ६८८६४ पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे अधिकारी नोकऱ्या सोडत आहेत.

यावर बोलताना राज्यमंत्र्यांकडून असे सांगण्यात आले की, तीनही दलातील अधिकाऱ्यांची कमतरता भरुन काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तरुणांना जागरुक केले जात आहे. वेळोवेळी कँपेन चालवले जात आहेत. प्रमोशन मध्ये सुधारणा, आकर्षक वेतन, धोकादायक आव्हाने पेलले तर बक्षीस दिले जाते. कुटूंब आणि घरासाठी सुविधा देण्यात येणार आहेत.

तीनही दलात अधिकारी पदे रिक्त –

राज्यमंत्री म्हणाले की, अधिकाऱ्यांची एकूण ५०जार ३१२पदे आहेत. त्यातील ४२९१३पदांवर अधिकारी काम करत आहेत. म्हणजेच एकून ७३९९ पदे रिक्त आहेत. नौदलात ११५५७ अधिकारी पद आहेत. त्यात  १० ०१२पदांवर अधिकारी आहेत, तर १५४५ पदे रिक्त आहेत. वायू दलात १२६२५ पदे आहेत त्यातील ४८३ पदे रिक्त आहेत. तीनही दलांचे एकूण ९४२७ पदे रिक्त आहेत.

पर्सनल बिलो ऑफिसर पदे रिक्त –

नौदलात १६,८०६पद रिक्त आहेत. लष्करात ३८३२५ पदे तर वायू दलात १३८२३ पदे रिकामी आहेत. तर १७१८ पदांवरचे एपीएस नॉन रेग्युलकर जेसीओ आणि १०४८६ जवान सध्या लष्करात वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्राथमिक प्रशिक्षण घेत आहेत.

 

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ‘हा’ फेसपॅक लावा ; जाणून घ्या प्रोसेस

रक्त शुद्ध करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन करा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील