मुलाखतीनंतर ‘थेट’ रेल्वेत नोकरी, भूसावळ येथे होणार मुलाखत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही सरकरी नोकरीच्या शोधात असाल तर रेल्वे तुम्हाला फक्त मुलाखतीच्या आधारे नोकरी देऊ शकते. भारतीय रेल्वेत नोकरी मिळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या बद्दलचे नोटिफिकेशन रेल्वेने दिले आहे. यात स्टाफ नर्स पदासाठी भरती करण्यात येणार असून यासाठी रेल्वेने अर्ज मागवले आहेत. एवढेच नाही तर ही पदे फक्त मुलाखतीवर भरण्यात येणार आहेत. इच्छूक उमेदवारांचा २९ जुलैला ‘वॉक इन इंटरव्यू’ असणार आहे. यासाठी रेल्वे ३१ पदांसाठी अर्ज मागवत आहे.

या पदांसाठी मुलाखत २९ जुलैला आणि ३० जुलैला होणार आहे. जर उमेदवार बाहेर गावाहून येणार असेल तर त्यांनी ३ दिवसाची तयारी करुन यावे असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

पदासाठी शैक्षणिक योग्यता

१. रजिस्टर्ड नर्स किंवा मिडवाइफचे सर्टिफिकेट हवे.

२. जनरल नर्सिंग किंवा नर्सिंग मध्ये B.SC झालेले पाहिजे.

वयाची मर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते ४० वर्षे असणे आवश्यक आहे. हेच उमेदवार मुलाखतीत सहभागी होऊ शकतात.

मुलाखतीचे स्थळ

उमेदवारांना वॉक इन इंटरव्युसाठी या पत्यावर जावे लागेल.
चीफ मेडिकल सुपरीटेंडेंट ऑफिस, डिवीजनल रेल्वे, रुग्णालय, सेंट्रल रेल्वे, भूसावळ, महाराष्ट्र.

अधिक माहितीसाठी या संकेतस्थळाला भेट द्या –
https://cr.indianrailways.gov.in/

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

 

 

Loading...
You might also like