महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) आयोगामार्फत विविध पदांसाठी 806 जागा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी 806 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन आहे. यासाठी उमेदवार 19 मार्च 2020 पर्यंत अर्ज करु शकतात.

पद आणि पदसंख्या –
1. सहाय्यक विभाग अधिकारी (Assistant section Officer) – 67 जागा
2. राज्य कर निरीक्षक (State Tax Inspector) – 89 जागा
3. पोलीस उपनिरीक्षक (Police sub inspector) – 650 जागा

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 19 मार्च 2020, 23.59 वाजेपर्यंत

शैक्षणिक पात्रता –
मान्यता प्राप्त संस्थेची पदवी, मराठी भाषेचे ज्ञान

वयाची अट –
1 जून 2020 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय – 5 वर्ष सूट)

वेतनमान –
38,600 रुपये ते 1,22,800 रुपये आणि इतर भत्ते

परिक्षा शुल्क –
374 रुपये (मागसवर्गीय/अनाथ – 274 रुपये)

नोकरीचे ठिकाण –
संपूर्ण महाराष्ट्र

परिक्षा केंद्र – महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

असा करा अर्ज –
उमेदवार अर्ज करण्यासाठी https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx या वेबसाइटवर अर्ज करु शकतात. याच वेबसाइटवरुन उमेदवारांना परिक्षा शुल्क ऑनलाइन भरता येईल.

वय, शारीरिक अर्हता या संबंधित माहिती https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/AdvtList/05-2020.pdf या लिंकवर उपलब्ध आहे.

https://www.mahanmk.com/recruitment/mpsc-recruitment-28022020.html