संरक्षण मंत्रालयात १७०० पदांसाठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या १ हजार ७०४ जागा भरण्यात येणार आहेत. त्यानुसार इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी बीई, डिप्लोमा, बी टेक, एम टेक पदवी पात्र उमेदवार अप्लाय करु शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – बीई , डिप्लोमा , बी. टेक , एम. टेक पदवी

वेतन – ९ हजार ३०० ते ३४ हजार ८०० पर्यंत

वयोमर्यादा – खुल्या गटासाठी – १८ ते २७ , आरक्षित वर्गाला वयोमर्यादेत सूट

अंतिम तारीख – ९ जून २०१९

परीक्षा पद्धती – उमेदवारांची लिखिती परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना २०० गुण असणार आहे. त्यानंतर ट्रेड चाचणी घेण्यात येईल.