SBI मध्ये नोकरीची ‘सुवर्ण’संधी ! 26 जानेवारी अर्जाची ‘अंतिम’ तारीख तर ‘परिक्षा’ 19 एप्रिलला, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. बँकेत क्लार्क पदासाठी 8,114 जागेवर भरती केली जाणार आहे. 26 जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. 26 जानेवारीपर्यंत अर्जातील चुकांची दुरुस्ती देखील केली जाऊ शकते.

अर्जदाराचे वय 1 जानेवारी 2020 ला 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असले पाहिजे. एससी आणि एसटी श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा पाच वर्षांनी अधिक आणि ओबीसी वर्गाला तीन वर्ष अधिक देण्यात आलेली आहेत. अर्जदाराने कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. लेखी परीक्षेची तारीख 19 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.

हिमाचलच्या अर्जदारांची लेखी परीक्षा बिलासपूर, हमीरपूर, कांगड़ा, कुल्लू, मंडी, शिमला आणि उना येथे होईल. हिमाचलसाठी 180 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. परीक्षा दोन टप्प्यात असेल. पहिला टप्पा 100 गुणांचा असेल तर दुसरा टप्पा 200 गुणांचा असेल. खुल्या आणि ओबीसी वर्गासाठी 750 रुपये आणि एससी,एसटी वर्गासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही. हा शुल्क डेबिट किंवा नेटबँकिंगच्या मार्फत भरावा लागेल. याबाबतची अधिक माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. लोक मित्र केंद्रावर देखील ऑनलाइन पद्धतीने फॉर्म भरला जाऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/