राज्य शासनाच्या २९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्य शासनाच्या विविध विभागात रिक्त असणाऱ्या २९ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला आरंभ झाला आहे. या भरतीपैकी १३ हजार पदे ग्रामविकास विभागात भरण्यात येणार आहेत. तसेच या भरती प्रक्रियेत ग्रामविकास विभागातील पदांची संख्या हि सर्वाधिक आहे. त्याच प्रमाणे लोकसभा निवडणुकी नंतर जलसंपदा विभाग आणि पोलीस दलातील ७ हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात १ लाख २० हजार पदे हि रिक्त आहेत. मागच्या काही काळात ७० हजार पदांची मेगाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी ग्रामविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभागातील ५ हजार ७८० पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या दोन विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यासाठी हि जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच राज्यात ८० हजार पदांची भरती करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्यापैकी ३५ हजार पदांची भरती हि पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे.

पशुविकास विभाग, जलसंधारण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील नोकर भरतीसाठी जानेवारीमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत ८७७ वैद्यकीय अधिकारी, जलसंवर्धन विभागात ३००, वन विभागा २ हजार रक्षक, ९६० ऑडिट सहाय्यक आणि निरीक्षक तसेच महसूल विभागात १८०० तलाठी पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीची विस्तारित माहिती शासनाच्या अधिकृत संकेत स्थळावर तसेच सरकारी पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली आहे.