Pune Metro : पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधरकांची मोठी नोकर भरती, जाणून घ्या प्रक्रिया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरस (Coronavirus) या जागतिक महामारीच्या काळात बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पुण्यात (Jobs in pune) सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. पुणे मेट्रोमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

टेक्निशियन, स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर, सेक्शन इंजिनिअर, ज्युनिअर इंजिनिअर इत्यादी जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांना मेट्रोच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण 139 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्यासाठी खाली लिंक देण्यात आली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन पुणेद्वारे (Marharashtra Metro Rail Corporation Pune) हे अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे.

शिक्षणाची अट
– टेक्निशिअनसाठी आयटीआय (NCVT/SCVT)
– स्टेशन कंट्रोल, ट्रेन ऑपरेटरसाठी – तीन वर्षाचा इंजिनिअर डिप्लोमा इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनीक्स, मेकॅनिकल, मान्यताप्राप्त विद्यापीठ.
– सेक्शन इंजिनिअर – 4 वर्षे इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण
– ज्युनिअर इंजिनिअर – 3 वर्षाचा इंजिनिअर डिप्लोमा

परीक्षा शुल्क
खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये आणि राखीव वर्गासाठी 150 रुपये फी आकारण्यात येणार आहे. परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

नोटिफिकेश पाहण्यासाठी, अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.mahametro.org/Career.aspx

अधिकृत वेबसाईट
https://www.mahametro.org/