Gastric Headache : वारंवार डोकेदुखी होणे अ‍ॅसिडिटीचे आहे लक्षण, दुर्लक्ष केले तर होईल अल्सर

नवी दिल्ली : डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. अनेक लोक यावर उपचार सुद्धा करत नाहीत. तणाव, अ‍ॅलर्जी, लो ब्लड शुगर किंवा हाय ब्लड प्रेशर इत्यादीमुळे डोकेदुखी होते. मात्र, अ‍ॅसिडिटीमुळे सुद्धा डोकेदुखी होऊ शकते. पोटात जास्त अ‍ॅसिड तयार होऊ लागले तर डोकेदुखी होते. याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात अल्सरसारखा आजार होऊ शकतो.

अपचनामुळे सुद्धा गॅस्ट्रिक हेडएक
गॅस्ट्रिक हेडएक अपचन किंवा बद्धकोष्ठतेमुळे होते. यामुळे डोकेदुखी होते. पोटात गॅस तयार होऊ लागल्यामुळे गॅस्ट्रिक हेडएक होतो.

सतत डोकेदुखी असेल तर अल्सरचा धोका
अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, ज्यांना वारंवार डोकेदुखीची समस्या होते त्यांना पोट आणि अपचनाच्या समस्येचा धोका असतो. विशेष करून पोटात अल्सर किंवा पेप्टिक अल्सर सारखी गंभीर समस्या सुद्धा होऊ शकते. रिसर्चनुसार, ज्यांना नियमित डायरिया, बद्धकोष्ठता, जीव घाबरणे किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सचा त्रास असतो त्यांच्यात डोकेदुखी किंवा मायग्रेनचा धोका जास्त असतो, त्या लोकांच्या तुलनेत ज्यांना गॅस्ट्रिकशी संबंधीत लक्षणे नसतात.

अ‍ॅसिडिटी आणि डोकेदुखीचे घरगुती उपाय

1 अर्धा ग्लास ताकात 1 चमचा कोथेंबिरीचा ज्यूस मिसळून प्यायल्याने डोकेदुखी आणि अ‍ॅसिडिटी दोन्हीत आराम मिळतो.
2 आठ – दहा तुळशी पाने चावून खाल्लयास डोकेदुखी आणि अ‍ॅसिडिटी दूर होऊ शकते.