Recurring Payments | बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! RBI कडून आवर्ती व्यवहारांच्या मर्यादेत वाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Recurring Payments | बँक ग्राहकांसाठी (Bank Customer) महत्वाची माहिती आहे. आरबीआयकडून (RBI) ई-आदेशाच्या माध्यमातून अतिरिक्त घटक प्रमाणीकरण शिवाय (म्हणजे OTP) आवर्ती व्यवहारांची (Recurring Payments) मर्यादा सध्या 5 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करण्यात आली आहे. हे ग्राहकांना OTP सारख्या प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकाव्यतिरिक्त त्यांचे डेबिट (Debit Card) अथवा क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरून शैक्षणिक शुल्क (Tuition Fees), विमा प्रीमियम पेमेंट (Insurance Premium Payment) इत्यादीसारखे उच्च मूल्याचे व्यवहार करण्यास मदत करण्यास आहे.

 

आवर्ती व्यवहारासाठी ई आदेश 1 ऑक्टोबर 2021 रोजी पासून आधीच लागू झाला होता. यानुसार आता ऑटो-डेबिट पेमेंट (Auto-Debit Payment) वजा करण्याच्या कमीत कमी 24 तास आधी बँकेने ग्राहकाला सूचना पाठवणे आवश्यक आहे आणि ग्राहकाने त्याची पुष्टी केल्यानंतरच डेबिटला परवानगी द्यावी लागेल. (Recurring Payments)

 

मध्यवर्ती बँकेनुसार (Central Bank) बँका आणि इतर वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांना पेमेंटसाठी स्वयं-डेबिट आदेश 5 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास अतिरिक्त घटक प्रमाणीकरण (OTP किंवा ईमेल पुष्टीकरण) प्रदान करण्यास सांगणे गरजेचे आहे. समजा ई आदेश 15 हजार रुपयांपेक्षा अधिक आवर्ती पेमेंटसाठी असेल तर हे अतिरिक्त प्रमाणीकरण आवश्यक असणार आहे.

बँक खात्यातून सूचना काय असणार?
व्यवहारा अगोदरची सूचना SMS, ईमेल इत्यादींच्या माध्यमातून पाठवली जाणार आहे. अधिसूचना कार्डधारकाला व्यापार्‍याचे नाव,
व्यवहाराची रक्कम, डेबिटची तारीख/वेळ, व्यवहाराचा संदर्भ क्रमांक/ ई-आदेश, डेबिटचे कारण, अर्थात, कार्डधारकाने नोंदणीकृत ई-आदेश याविषयी माहिती देईल.
कार्डधारकाला त्या विशिष्ट व्यवहारातून अथवा ई-आदेशातून बाहेर पडण्याची सुविधा असणार आहे. ऑटो-डेबिट झाले आहे याची खात्री करण्यासाठी,
ग्राहकाने योग्य मोबाइल नंबर डेबिट/क्रेडिट कार्डशी जोडलेला असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला मंजुरीसाठी सूचना मिळू शकणार आहे.

 

कोणत्या पेमेंटवर होणार परिणाम?
नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राइम, स्पॉटिफाई, ऍपल म्युझिक सारख्या OTT प्लॅटफॉर्मवर सबस्क्रिप्शन यांसारख्या जसे मोबाईल बिल भरणे,
विमा प्रीमियम, युटिलिटी बिल पेमेंटसाठी त्यांच्या डेबिट/क्रेडिट कार्ड आणि/किंवा मोबाईल वॉलेटमधून आवर्ती
पेमेंटसाठी ऑटो-डेबिट आदेश दिलेल्या ग्राहकांवर नवीन प्रमाणीकरण नियमांचा परिणाम होईल.

 

Web Title :- Recurring Payments | reserve bank of india hikes limit on auto debits from debit credit cards sans otp to rs 15000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळूनही धमकावणारा सावकार अटकेत

 

Maharashtra Crime | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची 6 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या, प्रचंड खळबळ

 

HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण