पोलीसनामा ऑनलाइन – तुम्ही जर कधी नीट निरीक्षण केलं असेल, तर बऱ्याचशा लोगोमध्ये लाल आणि पांढरा रंग हमखास दिसतो; तसेच त्यापेक्षाही नवल म्हणजे असे व्यवसाय यशस्वी होण्याचे प्रमाणपण फार जास्त असते. त्यामागचे रहस्य आज आपण जाणून घेणार आहोत.
सहसा, कोणतेही खाद्यपदार्थ, कपड्यांचा व्यवसाय, प्रवास आणि पर्यटन (travel & tourism) अशा व्यवसायांना हा रंगसंगती (combination) फार उपयुक्त ठरतो. त्यामागचे कारण असे की, लाल रंग हा आकर्षनाचा व वासनेचा रंग आहे आणि आपल्या डोळ्यांना तो लगेच आकर्षित करतो. त्याचसोबत पांढरा जरी आपण संयम आणि शांतीसाठी वापरत असलाे, तरीही त्यामध्ये सात रंगांचे मिश्रण असते.
आणि याचाच फायदा व्यवसायाला आणि व्यवस्थापनाला शांत राहून वेगवेगळे नियोजनबद्ध काम करायला मदत होते; परंतु याचा कदापि हा अर्थ होत नाही की, हे दोन रंग वापरले की व्यवसायाला यश मिळेलच, कारण लाल रंग असलेली (air india, king fisher, air lines) त्या कंपन्या अत्यंत तोट्यात गेल्यात. फक्त लाल रंगाचा उपयोग केल्याने अशा व्यवसायाला सुरुवातीला तर यश मिळते, परंतु कालांतराने कायदेशीर अडचणी येतात म्हणून फक्त लाल रंग लोगोमध्ये वापरणे टाळावे.
त्यापलीकडेही जाऊन लाल आणि पांढऱ्या रंगाचा योग्य प्रमाणात वापर करून व्यवसायात उभारी येते. असे आपल्याकडे बरेचशे उदाहरणे आहेत. (जसे airtel, vodafone, jio, zomato, make my trip) एवढंच कशाला रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्याचा बोर्डपण काही असाच असतो आणि तोपण दररोज एका सुशिक्षित तरुणापेक्षा जास्त कमवतो, आहे का नाही गंमत?
अधिक माहितीसाठी – डॉ. नवनीत मानधनी (86051 12233)
क्रमश :