‘लाल’ रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असते ‘ही’ विशेष गोष्ट, प्रेमाच्या बाबतीतही असतात इतरांपेक्षा वेगळे !

पोलीसनामा ऑनलाईन : मोजता येणार नाहीत इतके नानाविध रंग जगात आहेत पण आपल्याला या अनेक रंगांपैकी कुठलातरी एक खास रंग भावतो जो आपल्याला खूप आवडतो. आपली ही रंगाबद्दलची आवड आपल्या वस्तू, कपडे व इतर गोष्टींतून दिसून येते. पण तुम्हाला माहित आहे का? जो रंग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो त्या रंगावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावला जाऊ शकतो. तुमच्या सायकॉलॉजीविषयी तुमचा आवडता रंग बरंच काही सांगून जात असतो. माणसांच्या वागणुकीला रंगांशी जोडून कलर सायकॉलॉजी अंतर्गत स्टडी केला जातो.

अनेक मोठ्या कंपन्या ग्राहकांना आपल्या प्रोडक्ट्सकडे वळवण्यासाठी या सायकोलॉजीचा वापर करत असतात. या अशाच अनेक रंगांपैकी एक अगदी ठळक व नजरेत सामावणारा रंग म्हणजे लाल रंग होय. लाल रंगाला अनेक पवित्र गोष्टींचे प्रतिक मानतात. या रंगात जसा एक विशिष्टपणा सामावला आहे तसाच एक विशिष्टपणा लाल रंग आवडणाऱ्या व्यक्तींमध्ये असतो आणि त्या व्यक्ती या इतरांपेक्षा वेगळ्या असतात. नेमकं ते वेगळेपण काय असतं? व लाल रंग आवडणाऱ्या व्यक्ती सर्वच बाबतीत कशा असतात? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

लाल रंग तुमच्याही आवडीचा आहे का?

आज आपण लाल रंगाविषयी जाणून घेणार आहोत, लाल रंगाला सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह किंवा आकर्षक रंग म्हणतात, लाल रंग हा कितीही लपवला तरी तो नजरेस पडतोच. याचं कारण म्हणजे हा रंग असा असतो की जो एका सेकंदातच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करत असतो. लाल रंग जर तुमच्याही आवडीचा असेल तर हा रंग तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल (personality) बरेच काही सांगून जातो. हा रंग आवडणाऱ्या व्यक्ती जेव्हा रिलेशनशीप मध्ये असतात तेव्हा आपल्या जोडीदारासोबत कशा पद्धतीने वागतात याबद्दलही अनेक गोष्टी सांगतो.

रिस्क घ्यायला नेहमी तयार असतात

विशेष म्हणजे लाल रंग हा पॅशन व धोका दोघांचं चिन्ह आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. लाल रंग आवडणाऱ्या लोकांच्या व्यक्तिमत्वात हे दोन्ही गुण हमखास पाहायला मिळत असतात. सतत नवीन गोष्ट करण्यात ही लोकं मग्न असतात आणि यासाठी ते हवी ती रिस्क देखील घेऊ शकतात. या अशा काही कारणांमुळे ते बऱ्याचदा अडचणीत देखील अडकतात. पण अशा कठीण काळातूनही मार्ग काढण्याची जिद्द त्यांच्यात असते. ते कधीच खचून जात नाहीत. त्यामुळे ही लोक यशस्वी होईपर्यंत झगडत असतात आणि एक दिवस यशस्वी होतातच, त्यामुळेच तर म्हटले जाते ना… रिस्क है तो इश्क है!

नेतृत्व गुण (leadership quality)

लाल रंग आवडणाऱ्या लोकांची वागणूक ही इतरांपेक्षा त्यांना खास बनवते. ते जेव्हा समोर येतात तेव्हा सर्वांचं लक्ष आपसुकच आपल्याकडे वेधून घेत असतात. त्यांचं आउटगोइंग नेचर व सतत नवीन काहीनाकाही करून दाखवण्याची जिद्द त्यांना वर्कप्लेसवर इतरांपेक्षा वेगळं बनवते. त्यांच्या आसपास काय सुरू आहे याचं भान त्यांना नेहमी असते, ज्यामुळे ते नेहमी अलर्ट राहायला शिकतात. या अशा विविध कारणांमुळे हे लोक लीडरशीप म्हणजेच नेतृत्व करण्याची भूमिका खूप चांगल्या प्रकारे निभावतात.

प्रेमात वर्चस्व (Dominance in love)

लाल रंग आवडणाऱ्या व्यक्तींना रिलेशनशीप मध्ये आपल्या जोडीदारावर हावी व्हायला खूप आवडतं. हे लोक अजिबात नकारात्मक नसतात, ते नेहमी आपल्या जोडीदाराला सुरक्षित ठेवण्यासाठी व नात्यात संयम व रोमांस जिवंत टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण त्यांची ही वागणुक समजून घेण्यासाठी जोडीदाराला समस्या उद्भवते. कारण ही वागणुक त्यांना कंट्रोलिंग व ओव्हर पझेसिव्हनेस वाटते. त्यामुळे अशा परिस्थितीत समतोल राखणं खूपच अवघड होते.

रोमांसमध्येही पॅशन

लाल रंग आवडणाऱ्या व्यक्तींना पॅशनेट रोमांस आवडतो. यासाठी शारीरिक फुलफिलमेंट जरुरी असते. याशिवाय ही लोक आपल्या भावनांबाबत खूपच एक्सप्रेसिव्ह असतात. रिलेशनशीपमध्ये असताना या लोकांना रिलेशनशीप संबंधित खास दिवस साजरे करायला खूप आवडतात. जो रोमांस सिनेमात दाखवतात तो रोमांस या लोकांना रियल लाइफ मध्येही करायला आवडतो. हे लोक आपल्या नात्याला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी ते सतत नवनवीन कल्पना शोधत राहतात. एकूणच काय तर ही लोक अतिशय रोमॅंटिक अशी असतात.