Red Fort Violence Case | लाल किल्ला हिंसा प्रकरणातील एक लाखाचे बक्षीस असलेल्या गुरजोत सिंहला अमृतसरमधून अटक, किल्ल्यावर फडकवला होता झेंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – राजधानी दिल्लीत 26 जानेवारी 2021रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसा प्रकरणात (Red Fort Violence Case) दिल्ली स्पेशल सेलने एक लाखाचे बक्षीस असलेल्या गुरजोत सिंहला अटक (Gurjot Singh Arrest) करण्यात आली आहे. आरोपी गुरजोत सिंहला पंजाबच्या अमृतसरमधून (Amritsar) दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलने अटक केली आहे. या कारवाईला दिल्ली डीसीपी स्पेशल सेल संजीव यादव (Sanjeev Yadav) यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी म्हटले, लाल किल्ल्यावर निशाण साहिबचा झेंडा (Sahib’s flag) फडकवल्याच्या आरोपात गुरजोत सिंहला अटक झाली आहे. red fort violence case gurjot singh who reward rs 1 lakh on his head arrested by special cell

घुमटावर चढून फडकवला होता झेंडा
दिल्ली पोलीसांच्या स्पेशल सेलचा (Special cell) आरोप आहे की, घटनेनंतर गुरजोत सिंह दिल्ली पोलिसांच्या हाताला लागला नव्हता आणि तो पळून पंजाबला गेला होता. फरार असलेल्या गुरजोत सिंहला आता अमृतसरमधून अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी लाल किल्ला हिंसाप्रकरणात आतापर्यंत दीप सिद्धू (Deep Sidhu), गुरजंत सिंह (Gurjant Singh), जुगरात सिंह आणि गुरजोत सिंह यांची माहिती देणार्‍यांना एक लाख रुपये रोख रक्कमेचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती.

दीप सिद्धूसह 16 आरोपी
काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील दीप सिद्धूसह 16 लोकांविरूद्ध दिल्ली पोलिसांनी प्लीमेंट्री चार्जशीट दाखल केले आहे. तर 17 मेरोजी 3 हजारपेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. शेतकरी आंदोलनादरम्यान (Peasant movement) लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेतील मुख्य आरोपी दीप सिद्धूला पोलिसांनी 9 फेब्रुवारी 2021 ला अटक केली होती. दीप सिद्धूवर लाल किल्ला प्रकरणात हिंसा भडकवणे आणि कट रचल्याचा आरोप आहे.

Web Titel :- red fort violence case gurjot singh who reward rs 1 lakh on his head arrested by special cell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक