रेड लेबल ‘त्या’ जाहिरातीमुळं झालं ‘ट्रोल’, हिंदूविरोधी असल्याची टीका (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आतापर्यंत आपण एखाद्या सिनेमातील आक्षेपार्ह संवादामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्याचा प्रकार बॉलीवूड मध्ये अनेकदा पहिला आहे किंवा काही संवादांमुळे चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादात सापडल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र आता एक नामांकित कंपनीची जाहिरात अशा अडचणीत सापडली आहे.

रेड लेबल चहाची जाहिरात आपण सगळे अनेकदा टीव्हीवर पाहतो मात्र ही जाहिरात आता वादात सापडली आहे. ही जाहिरात हिंदू विरोधी आहे असे म्हणत काही जणांनी यावर आक्षेप घेतला आहे. तर सोशल मीडियावर #boycottredlabel हा हॅशटॅग जोरात ट्रेंडिंगवर आहे.

नेमकं काय दाखवली या रेड लेबलच्या जाहिरातीत
सुरुवातीला या जाहिरातीत एक हिंदू व्यक्ती मुस्लिम कारागिराकडून गणपती घेण्यास नकार देतो. त्यानंतर चहा पिताना हा तरुण त्या कारागिराशी गप्पा मारतो आणि त्याचे मत परिवर्तन होते.

https://twitter.com/Payal_Rohatgi/status/1168090947013373952

कोल्हापूर, सोलापूर, फलटण या ठिकाणी रेड लेबलवर तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर प्रत्येकवेळी हिंदू धर्मीयांनाच सहिष्णुतेचेचे धडे का शिकवले जातात असा सवाल यावेळी लोकांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –