रेडमी 8A Dual चा ‘पहिला-वहिला’ सेल सुरू, ‘या’ आहेत ऑफर्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शाओमीचा लेटेस्ट बजेटमधील स्मार्टफोन रेडमी 8A ड्युअल चा आज पहिला सेल सुरू झाला असून कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आणि ऍमेझॉन वर हा सेल सुरु आहे. त्यामध्ये ग्राहकांना विशेष डिस्काउंट आणि ऑफर्स दिले जात आहे. आयसीआयसीआय बँक आपल्या ग्राहकांना या फोनवरील खरेदीसाठी ५ टक्के सूट देत आहे. हा मोबाईल कंपनीने मागच्या महिन्यात लॉन्च केला होता.

रेडमी 8A ड्युअल ची किंमत
ग्राहकांसाठी हा फोन दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ते पर्याय म्हणजे २ जीबी आणि ३ जीबी मध्ये हा मोबाईल मिळणार आहे. अनुक्रमे या मोबाईलची किंमत ही ६ हजार ४९९ आणि ६ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फोनची विक्री ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि ऍमेझॉन वरून होणार आहे. या मोबाईलचा पहिला सेल हा १८ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे

रेडमी 8A ड्युअल चे फीचर्स

या फोन मध्ये ६.२२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये २ जीएचझेड क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅमच्या फोनमध्ये ३२ जीबीचे स्टोरेज मिळणार आहे. या मध्ये व्हीओवायफाय फिचर आणि दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळणार आहे. यामध्ये ५००० एमएएच ची बॅटरी क्षमता आणि १८ वॅटचा फास्ट चार्जर दिलेला आहे, तसेच यामध्ये रिव्हर्स चार्जिंग चे फिचर देण्यात आले आहे. सेल्फी कॅमेरा हा ८ मेगापिक्सलचा आहे.

शाओमीची पॉवर बँक
मोबाइल फोनसोबतच कंपनीने आज दोन पॉवर बँक सुद्धा लॉन्च केल्या आहेत. १०,००० आणि २०,००० हजार एमएएच या क्षमतेच्या दोन पॉवर बँक आहेत. यामध्ये ड्युअल इनपुट्चा सपोर्ट दिलेला आहे. दहा हजार क्षमता असणाऱ्या बॅटरीत १० वॅट फास्ट चार्जिंग तर वीस हजार क्षमता असणाऱ्या बॅटरीमध्ये १८ वॅट फास्ट चार्जिंग देण्यात आले आहे. १०,००० हजार क्षमतेच्या बॅटरीची किंमत ७९९ रुपये, तर २०,००० क्षमता असणाऱ्या बॅटरीची किंमत ही १४९९ रुपये ठेवण्यात आली आहे.