‘आज’ केवळ 1 रुपयांमध्ये होईल Redmi वायरलेस हेडफोनची विक्री, ‘केव्हा’ होईल फ्लॅश सेल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या वेबसाईटवर दिवाळी विथ एमआय सेल (diwali with MI) सुरू केला आहे. हा सेल 16 ऑक्टोबरपासून सुरू झालेला असून तो 21 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये विविध प्रोडक्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला असून रोज 1 रुपयांच्या फ्लॅश सेलचं आयोजन देखील करण्यात येत आहे.

हा 1 रुपयावाला फ्लॅश सेल मंगळवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता आहे. या फ्लॅश सेलमध्ये ग्राहकांना केवळ 1 रुपयांत Redmi SonicBass Wireless Earphones Blue खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या सेलमध्ये अगदी कमी वेळात प्रोडक्ट्स हे आउट ऑफ स्टॉक होत असतात.

या Redmi SonicBass Wireless Earphones ची किंमत 999 रुपये असून बॅटरी 120mAh ची आहे. तसेच यामध्ये 12 तास म्युझिक प्लेबॅक मिळण्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या नेकबँड ईयरफोनचं वजन 21.2 ग्रॅम असून या ईयरफोनला 10 मीटरच्या अंतरावरून देखील ऑपरेट केले जाऊ शकते. दरम्यान मायक्रो -USB केबलने या ईयरफोनला संपूर्ण चार्ज करण्यासाठी सुमारे दोन तासांचा अवधी लागतो.

या ईयरफोनमध्ये 9.2mm डायनॅमिक ड्रायवर्स वापरण्यात आले आहेत. तसेच ब्लूट्यूथ V5.0 कनेक्टिव्हिटी सपोर्ट, अँड्रॉईड iOS आणि विंडोज दोन्हीसह वापरता येणार आहे.