Redmi Note 9 Pro Max भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात रेडमीने गुरुवारी रेडमी नोट ९ सीरिजचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट ९ प्रो मॅक्स लाँच केला आहे. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी Redmi Note 9 Pro Max ची सुरवात केली. ते स्टेज वर येताच म्हणाले, Redmi Note 9 Pro Max लाँचचा कार्यक्रम काही कारणास्तव रद्द करावा लागला. कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार घातल्याने हा कार्यक्रम रद्द करावा लागला असला तरी त्यांनी थेट कोरोनाचा उल्लेख करणे टाळले .

रेडमीने आज रेडमी नोट प्रो मॅक्ससह रेडमी नोट ९ प्रोचे दोन प्रकार लाँच केले आहेत. रेडमी नोट ९ लाँच कार्यक्रमात शाओमीने विचारलेल्या ९ प्रश्नांचे अचूक उत्तरे देणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे. सोशल मीडिया हँडलवरून या प्रश्नांची उत्तर दिली जाऊ शकतात. मनु कुमार जैन यांनी भारतात आतापर्यंत १०० मिलियनहून अधिक रेडमीचे फोन विकल्याची माहिती दिली आहे.

रेडमी नोट ९ प्रो च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १८ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. रेडमीने या फोनला ऑरोरा ब्लू, व्हाइट आणि इंटरस्टेलर या तीन रंगात उपलब्ध करून दिले आहे. २५ मार्चपासून रेडमीच्या या फोन ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडिया ,एमआय डॉट कॉम आणि एमआय स्टोअरवरून केली जाणार आहे.

रेडमी नोट ९ प्रो मॅक्सची खास वैशिष्ट्ये
शाओमीने आतापर्यंत दिलेली हा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. या फोन मध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज, ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज अशा तीन प्रकारात हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला व बॅकला कॉर्निंग गोरिला ग्लास ५ दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७०० सीरिजसह दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३.५ एमएम हेडफोन जॅक, इन्फ्रारेड अमिटर सह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर फीचर्स दिले आहे. फिंगरप्रिंट सेन्सरचे बटनमध्ये इंटिग्रेट करण्यात आले आहे. तसेच यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला आहे.

फोनमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनची बॅटरी केवळ ३० मिनिटात ५० टक्के चार्ज होते. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, ५ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर लेन्स दिले आहेत. फोनमध्ये ५०२० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. रेडमी फोनमध्ये आतापर्यंत देण्यात आलेली सर्वात मोठी क्षमता असलेली बॅटरी आहे. २० दिवसापेक्षा अधिक बॅटरी स्टँडबाय टाइम करते. २१० तास म्युझिक, २६ तास व्हिडिओ प्लेबॅक करते, असा कंपनीचा दावा आहे.