Reduce Bad Cholesterol Naturally | आजपासून सोडून द्या ‘या’ 4 वाईट सवयी, एक-एक रक्तवाहिनी होईल स्वच्छ; बाहेर पडेल घाणेरडे कोलेस्ट्रॉल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Reduce Cholesterol Naturally | कोलेस्टेरॉल (Cholesterol) एक मेणसारखे फॅट आहे जे शरीराच्या नसा किंवा धमण्यांमध्ये जमा होते. हे खराब कोलेस्टेरॉल (Bad Cholesterol) आहे, जे नसांमध्ये जमा होते (Reduce Bad Cholesterol Naturally). रोज खाल्ल्या जाणार्‍या काही गोष्टी आणि बैठी जीवनशैली म्हणजेच शारीरिक श्रम न केल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण (Cholesterol Level) वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे (How To Reduce Cholesterol Naturally).

 

सध्या कोलेस्ट्रॉल ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे अनेक लोक चिंतेत आहेत. हाय कोलेस्टेरॉलला (High Cholesterol) अनेकदा ’सायलेंट किलर’ म्हटले जाते कारण त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. उपचार न केल्यास, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका (Stroke And Heart Disease) यासारख्या मोठ्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो (Reduce Bad Cholesterol Naturally).

 

रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होते. यामुळे रक्ताभिसरणात घसरण होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कोलेस्टेरॉल कसे तयार होते, म्हणजेच ते रक्ताच्या नसांमध्ये कसे जमा होते ते जाणून घेवूयात…

रोज खाल्ल्या जाणार्‍या काही गोष्टी आणि बैठी जीवनशैली म्हणजेच शारीरिक श्रम न केल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक लोक औषधे किंवा वेगवेगळ्या गोष्टी घेण्यास सुरुवात करतात. त्याशिवाय तुम्ही शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकू शकता. कसे ते जाणून घेऊया (4 Easy And Effective Ways To Reduce Bad Cholesterol Naturally) –

 

या 4 वाईट सवयी सोडून द्या (Give Up These 4 Bad Habits)

1. वॉक न करणे (Not Walk)
एका संशोधनानुसार, चालणे आणि व्यायाम केल्याने सर्वसाधारणपणे कॅलरीज बर्न (Calories Burn) होतात आणि त्यामुळे वजन कमी होऊ शकते. यामुळे शरीरातील एलडीएल (LDL) म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सची पातळी (Triglycerides Level) कमी होऊ शकते आणि एचडीएल (HDL) म्हणजेच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, प्रत्येक आठवड्यात 150 मिनिटे चालल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते.

 

2. धूम्रपान करणे (Smoking)
तज्ज्ञांचे मत आहे की, धूम्रपान न केल्याने एचडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. धूम्रपानामुळे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. तंबाखू एलडीएल (खराब कोलेस्टेरॉल) वाढवते आणि एचडीएल (चांगले कोलेस्टेरॉल) पातळी कमी करते.

3. दारूचे सेवन करणे (Consumption Of Alcohol)
एकतर दारू कायमची सोडून द्या किंवा अगदी कमी प्रमाणात सेवन करा.
एका अभ्यासानुसार, दारूच्या सेवनाने लिव्हरचे नुकसान होते आणि नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढते.
हे लक्षात ठेवावे की दारूचे सेवन हे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे मूळ आहे.

 

4. गोड सेवन करणे, कमी शारीरीक हालचाली (Consuming Sweets, Less Physical Activity)
वजन वाढल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. यासाठी तुम्ही गोड पेये सोडून द्या.
दररोज वापरल्या जाणार्‍या कॅलरीजचा मागोवा ठेवा. दररोज व्यायाम करा किंवा काही शारीरिक हालचाली करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Reduce Bad Cholesterol Naturally | according to research 4 easy and effective ways to reduce bad cholesterol naturally

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या