लक्षवेधी ! आमदारांचं १ % आरक्षण कमी करा अन् ते अनाथांना द्या, बच्चू कडूंचा विधिमंडळात ‘रूद्रावतार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणानंंतर आता इतर समाजांकडून देखील त्यांच्या समाजाच्या आरक्षणाचा मु्द्दा उचलून धरला जात आहे. तर प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी अनाथांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. तर गृहनिर्माण संस्थेमधील सदनिकेमधील आमदारांचे २% आरक्षण १% करुन ते आरक्षण अनाथांना देण्यासंदर्भात कडू यांनी लक्षवेधी मांडली. त्याला उत्तर देताना १ तारखेला यासंदर्भात बैठक होईल असे सांगण्यात आल्याचे कडू यांनी सांगितले आहे.

कडू म्हणाले की, मराठा समाजाचे झाले आता धनगर समाजाचे आरक्षण बाकी आहे. सभागृहात आम्ही अनाथांना आरक्षण मिळावे यासाठी लक्षवेधी मांडली आहे. अनाथांना १ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, त्यांना ते आरक्षण अजून देखील मिळालेले नाही. कारण नेमके अनाथ कोणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. समांतर नोकऱ्यांमध्ये अनाथांना कशाप्रकारे आरक्षण द्यावे यासाठीच्या धोरणाबाबत एका राज्यस्तरीय समितीचे गठण करण्याचे मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. येत्या १ जुलैला यावर बैठक होईल.

अपंग बांधवांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून ३ % आरक्षण देण्यात येते. त्याचप्रकारे अनाथांना देखील १ % आरक्षण देण्यात यावे. वयाच्या २१ वर्षांनंतर अनाथांनी कुठे जावे, वसतीगृहानंतर त्यांना गाव नसते. घर नाही आणि देश देखील नाही. त्यामुळे त्यांना १% आरक्षण देण्यात यावे. तर गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदारांना सदनिकांसाठी २ टक्के आरक्षण देण्यात आले आहे, मात्र, आमदारांचे १ % आरक्षण कमी करुन, अनाथांना उरलेले १ % आरक्षण देण्यासंबंधित विधीमंडळात लक्षवेधी मांडण्यात आली आहे असे देखील बच्चू कडू यांनी सांगितले.

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव

माझ्या जीवाचं बरं वाईट झाल्यास विश्वास नांगरे पाटील आणि CM देवेंद्र फडणवीस जबाबदार – गुणरत्न सदावर्तें यांचा गौप्यस्फोट

नियमित भात खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

‘हात थरथरणे’ सामान्य समस्या नाही, कारण…

‘या’ पद्धतीने चहा पिणे आरोग्यासाठी घातक ; जाणून घ्या

You might also like