वजन कमी करायचंय ? रोज 4 कप कॉफी प्या अन् 15 दिवसांत वजन कमी करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तुम्हाला अनहेल्दी फूड खात असतानाही वजन कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही कॉफीच्या मदतीनं सहज वजन कमी करू शकता. होय, रोज चार कप कॉफी पिऊन तुम्ही अनहेल्दी फूडमुळे स्टोअर होणारं फॅट कंट्रोल करू शकता. कॉफीचे सीप तुम्हाला फॅट लूजसाठी मदत करतील. एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कॉफीत कॅफीन हाय शुगर असतं. फॅटवालं फूड खाल्ल्यानं तुमच्या बॉडीत स्टोअर होणारं कोलेस्ट्रोल कंट्रोलमध्ये रहातं. यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अभ्यासातून असं समोर आलं आहे की, कॉफी 20 ते 41 टक्के वजन कमी करते. कॉफीत कॅफीन असतं. यामुळे शरीरातील ऑक्सिटोसिनचं उत्सर्जन वाढतं. ऑक्सिटोसिन कॅलरीज बर्न करतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि भूकही वाढते. यामुळे वजन कमी होते. दीर्घकाळ कॉफीच्या सेवनानं वजन कमी होण्यास जास्त मदत होते.

रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की, हा प्रयोग जास्त वजन असणाऱ्या उंदरांवर करण्यात आला आहे. या उंदरांना कॅफीन जास्त प्रमाणात दिलं गेलं. यात असं दिसून आलं की, ते कमी खाऊ लागले आणि जास्त सक्रिय दिसून आले. यामुळे उंदरांचं वजन कमी होऊन ते सडपातळ झाले.

फेसबुक पेज लाईक करा –