Reducing Fat Under Chin-Throat | गळ्यासह हनुवटीच्या खालील चरबी कमी करण्यासाठी परिणामकारक आहेत या 6 एक्सरसाइज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Reducing Fat Under Chin-Throat | जर तुमच्या गळ्यासह हनुवटीखाली चरबी जमा (Reducing Fat Under Chin-Throat) झाली आहे किंवा तसे जाणवत असेल आणि यामुळे तुमच्या ओव्हरऑल लुकवर परिणाम होत असेल तर अनेक एक्सरसाइज, स्ट्रेच आणि मसाज आहेत ज्यांच्या मदतीने हा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. याबाबत जाणून घेवूयात…

 

1. चिन पुश स्माईल (chin push smile yoga)

 

खुर्चीवर आरामशीर बसा. कमरेला आधार देण्यासाठी उशी घ्या आणि ताठ बसा. आता हनुवटीवर बोटे ठेवा.
खालील जबडा बाहेर काढून हनुवटी बाहेर आणा, नंतर हनुवटी हळुवार दाबा. ओठ हलके उघडून स्माईल करा.
याच स्थितीत तीन सेकंद राहा आणि रिलॅक्स करा. हे दिवसात दोन वेळा 15-15 वेळा करा.

 

2. नॅचरल फेसलिफ्ट मसाज (natural facelift massage)

 

खुर्चीवर आरामशीर बसा. कमरेला उशीचा आधार द्या. आता फेस मिस्ट घ्या आणि यामध्ये काही थेंब फेस ऑईल मिक्स करा.
आता हाताचे तळवे एकमेकांवर रगडा. आंगठा खालच्या जबड्यावर ठेवा. हाताची पहिली बोटे फिरवा आणि त्यांना तोंडाजवळ ठेवा.
आता आरामशीर दाब द्या आणि हात कानाकडे घेऊन जा. काही वेळासाठी थांबा, नंतर हात पहिल्या स्थितीत आणा आणि ही कृती पुन्हा करा.
हे दिवसात एक किंवा दोन वेळा 20 वेळा रिपिट करा. (Reducing Fat Under Chin-Throat)

 

3. किस फेस एक्सरसाइज (kiss the sky face exercise)

 

प्रथम बसा, हात छातीवर कॉलर बोनच्या खाली ठेवा. मान वर उचला आणि छताकडे पहा. तोंड उघडून ओ बनवा.
आता तोंड बंद करा आणि असा प्रयत्न करा की तुम्ही छताला किस करत आहात. ही स्थिती काही सेकंद होल्ड करा आणि रिलॅक्स करा.
डोके खाली आणण्यापूर्वी अशाच प्रकारे 5 वेळा करा नंतर उजवीकडे पहा आणि मान एक्सटेंड करा. हे पाच वेळा करा.
असेच डावीकडे सुद्धा करा. हा सेट दिवसात दोन वेळा करा. (Reducing Fat Under Chin-Throat)

 

4. पर्स्ड लिप नेक स्ट्रेच (pursed lip neck stretches)

 

ही एक्सरसाइज करताना आरामशीर बसा किंवा उभे रहा. यानंतर वर छताकडे पहा.
ओठ असे बाहेर काढा जसे की छताला किस करत आहात.
या पोझिशनमध्ये सुमारे 10 सेकंद रहा. ही एक्सरसाइज दिवसात दोन वेळा करा. प्रत्येकवेळी 10-10 वेळा करा.

 

5. एक्सटेंड नेक फेस योग (extend neck face yoga method)

 

मॅट किंवा खुर्चीवर बसा, आता छताकडे पहा. तोंड एकदा पूर्ण उघडा आणि पुन्हा बंद करा.
असे दिवसात किमान दोन वेळा 15-15 वेळा करा.

 

6. गार्गलिंग फेस योगा (gargling face yoga method)

 

मॅटवर पाय असे दुमडून बसा की हिल्स तुमच्या हिप्सला स्पर्श करेल. तोंड असे फुगवा जसे की पाणी भरलेले आहे.
आता उजव्या गालात नंतर डाव्यात पुन्हा उजवीकडे तोंडात हवा फिरवा.
हे 20 वेळा रिपिट करा आणि दिवसात दोन वेळा करा. (Reducing Fat Under Chin-Throat)

 

Web Title : Reducing Fat Under Chin-Throat | these 6 exercises are very effective in reducing the fat under the chin along with the throat

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Fatty Liver Disease Signs | दारू पिणार्‍यांना सुद्धा होऊ शकते फॅटी लीव्हरची समस्या; जाणून घ्या कशी असतात लक्षणे

India vs Pakistan | टी-20 नंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात ‘आमने-सामने’

SmartPhone Safe Tips | स्मार्टफोन असा ठेवा सुरक्षित ! ऑनलाइन फसवणूक, मालवेयर आणि व्हायरसपासून कसा करावा बचाव? डेटा कसा ठेवावा सुरक्षित? जाणून घ्या