सरकारचे काम कमी गाजावाजा जास्त- खा.सुप्रिया सुळे

दौंड – पाेलीसनामा ऑनलाईन- (अब्बास शेख) लाखो रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली परंतु योग्य नियोजन आणि कामाचा अभाव असल्याने या योजनेचं काम कमी आणि गाजावाजाच जास्त असल्याची टीका बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंड तालुक्याचा धावता दौरा केला त्यांच्या नीधीतुन दौंड तालुका खरेदी-विक्री संघाच्या सभागृह उभारणीसाठी 20 लाख रूपयाचा निधी देण्यात आला होता त्यामधून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उदघाटन सुळे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश थोरात होते यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे सभापती झुंबर गायकवाड महिला बालकल्याण सभापती राणी शेळके मधुकर दोरगे कुंडलिक खुटवड सयाजी ताकवने रामभाऊ टुले योगिनी दिवेकर लक्ष्मण सातपूते नितीन दोरगे लक्ष्मण दिवेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुळे पुढे म्हणाल्या गॅस रॉकेल पेट्रोल डिझेल यांच्या किमती वाढल्या त्यामुळे महिला हवालदिल, शेतीमालाला बाजार नसल्याने शेतकरी वैतागला, जीएसटीमुळे व्यापारी घाबरला, नोकऱ्या नसल्याने युवक बेरोजगार अशा प्रकारची स्थिती असताना केंद्र आणि राज्यातील शासन ढिम्म आहे काही लोक म्हणतात आम्ही मोठा निधी आणला परंतु पैसा जनतेचा असतो त्यावर त्यांचा अधिकार असल्याने लोकप्रतिनिधीना काम करावेच लागते महाराष्ट्र शासन म्हणते आम्ही जलयुक्त शिवारची कामे केली परंतु कामापेक्षा त्यांनी गाजावाजा जास्त केल्याची वस्तुस्थिती आहे.

माजी आमदार रमेश थोरात म्हणाले तालुक्यातील धनगर समाजाला भूलथापा दिल्याने समाजाने मागील लोकसभा निवडणुकीत त्यांचे काम केले परंतु आता मात्र त्या॑ना उपरती झाली आहे. त्यामुळे धनगर समाजाने आपल्याला मतदान केलेच नाही असे ते म्हणू लागले आहेत. असे महादेव जानकर यांचे नाव न घेता त्यांनी टोला लगावला प्रस्ताविक संघाचे चेअरमन लक्ष्मण दिवेकर यांनी तर आभार संचालक भानुदास नेवसे यांनी मानले.