‘पेड सर्व्हिस’ची रक्कम ‘रिफंड’ करण्याच्या नावाखाली घातला ‘गंडा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नोकरी डॉटवरुन बोलतोय असे सांगून तुमची पेड सर्व्हिसचे पैसे रिफंड करण्याच्या नावाखाली ओटीपी नंबर घेऊन एका महिलेला तब्बल १ लाख १९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

सायबर गुन्ह्यात चोरटे वेगवेगळी कारणे सांगून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. त्यात सर्वप्रथम पैसे मिळणार असल्याची भूल त्यांच्यावर टाकली जाते. त्यामुळे लोक त्यातील धोके विसरुन आपल्या खात्याची गोपनिय माहिती सांगून टाकतात व नंतर त्यांना पस्ताविण्याची पाळी येते.

याप्रकरणी चिंचवड येथील एका ३८ वर्षांच्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १६ जुलैला घडली होती. त्या घरी असताना त्यांना एक फोन आला. त्याने मी नोकरी डॉट कॉमवरुन बोलतोय असे सांगून तुम्ही आमची पेड सर्व्हिस जी घेतली आहे. ती काही कारणास्तव अ‍ॅक्टिव्हेट होऊ शकत नाही तरी आम्ही तुमचे पैसे रिफंड करीत आहोत. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा असे सांगितले. पैसे परत मिळत असल्याचे समजताच त्यांनी फोन करणाऱ्यावर विश्वास ठेवून त्याला मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगितला. त्याद्वारे चोरट्याने महिलेच्या खात्यातून १ लाख १९ हजार ५०४ रुपये काढून घेऊन फसवणूक केली.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like