‘ऑनलाइन’ औषधे खरेदीसाठी डॉक्टरांचे ‘प्रिस्क्रिप्शन’ पाठवणे ‘अनिवार्य’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सर्वसाधारण औषधांसह गंभीर आजार असलेली औषधेही सर्रास ऑनलाइन पद्धतीने विकली जात आहेत. ही बाब निदर्शनास आणून देणारी जनहित याचिका नुकतीच उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेतून गंभीर आजारांसाठीच्या औषधांसाठी तज्ज्ञांचे मत घेणे आणि त्या संबंधीचे प्रिस्क्रिप्शन असणे अनिवार्य असावे अशी मागणी याचिकेदरम्यान करण्यात आली.
केंद्रसरकारणेही याची दखल घेतली असून, ई-फार्मसी पोर्टल नियम अद्यावत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सर्व ऑनलाईन कंपन्यांना केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच ऑनलाइन औषधे खरेदीसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन पाठवणेही अनिवार्य आहे.

औषध विक्री कंपन्यांनी स्पष्ट केलेले मुद्दे –
औषध विक्री कंपन्यांनी या दरम्यान स्पष्ट केलेला मुद्दा महत्वाचा ठरला. तो म्हणजे, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन ग्राहकाने व्हॅट्सऍप वरती पाठवल्यावरच औषधांची विक्री केली जाते. प्रिस्क्रिप्शन शिवाय औषधांची विक्री होत नाही.

ऑनलाइन पद्धतीने औषधे विक्री करण्याचा मसुदा येत्या २८ ऑगस्टला खंडपीठाद्वारे तयार केला जाईल आणि तो मसुदा सर्व औषध कंपन्यांना बंधनकारक असेल, असे सांगत खंडपीठाने याचिका निकाली काढली.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like