‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये १७०० विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – डेक्कन एज्युकेशन सोसायटीने स्थापन केलेल्या ‘डीईएस स्टार्ट अप क्लब’मध्ये पुणे, मुंबई, सांगलीतील १७०० विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन मोठा प्रतिसाद दिल्याची माहिती सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी दिली.

‘डीईएस स्टार्ट अप क्लब’चे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक सतीश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. कुंटे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कुंटे पुढे म्हणाले, ‘उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली आहे. इनक्युबेशन, स्टार्ट-अप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल अशी या विभागाची रचना असाणार आहे. ग‘ामीण अर्थव्यवस्थेवर आधारित व्यवसायांना प्राधान्य दिले जाणार आहे.’

श्री. मेहता म्हणाले, ‘स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नम‘ता हे गुण महत्त्वाचे आहेत. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्याबरोबर शारीरिक आणि मानसिक स्वास्थाकडे लक्ष दिले पाहिजे.’ यशश्री साने यांनी स्वागत, आदेश गोखले यांनी प्रास्ताविक केले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like